Imtiaz Jaleel vs Sangram Jagtap
Imtiaz Jaleel vs Sangram JagtapSarkarnma

Imtiaz Jaleel vs Sangram Jagtap : हिंसाचारानंतर 'AIMIM'ची सभा रद्द; इम्तियाज जलील यांचा षडयंत्राचा आरोप, तर जगताप म्हणाले, 'ते काही साधूसंत...'

Ahilyanagar AIMIM Asaduddin Owaisi Rally Cancelled Imtiaz Jaleel vs Sangram Jagtap Allegations : अहिल्यानगरमधील 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची सभा रद्द होताच इम्तियाज जलील यांनी पुणे इथं पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला.
Published on

AIMIM rally controversy Maharashtra : 'AIMIM'चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमधील आजची सभा रद्द झाली. यावरून 'AIMIM'चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या आरोपांचा युद्ध रंगले आहे.

अहिल्यानगरमधील हिंसाचाराच्या परिस्थितीचा आढावा पोलिसांकडून घेतला आहे. त्यामुळे 'AIMIM'ची ही सभा नऊ ऑक्टोबरला होईल, असे इम्तियाज जलील यांनी पुणे इथं पत्रकार परिषदेत सांगितले. हे सांगताना त्यांनी अहिल्यानगरमधील स्थानिक राजकीय परिस्थितीवर निशाणा साधताना गंभीर आरोप केले.

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी, 'नक्कीच तिथं आम्ही येऊ नये असे काहींना वाटत होते. यातून काही षडयंत्र रचले गेले. पोलिसांकडून देखील तसा संशय व्यक्त केला गेला आहे. तशी माहिती आहे. कारण आम्ही तिथं ताकद निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा निकाल तेव्हा ही ताकद सर्वांच्या लक्षात येईल.'

''AIMIM'च्या निर्माण झालेल्या ताकदीचा थेट फटका कोणाला बसला आहे, हे सर्वांना कळेल. पण तिथं काही षडयंत्र होते हे नक्की! तसं पोलिसांनी देखील संशय व्यक्त केला आहे. हे सर्व सुनियोजित होते. तसं प्लॅनिंग करून केलेलं होतं,' असा गंभीर आरोप इम्तियाज जलील केल्याने खळबळ उडाली आहे.

Imtiaz Jaleel vs Sangram Jagtap
Maharashtra Politics : विखे पाटील, मेघेंसह माजी मुख्यमंत्र्यांना दिलासा : 'तो' गुन्हा मागे घेण्यास राज्य सरकारला परवानगी

इम्तियाज जलील यांच्या या आरोपावर आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, "आम्ही त्याकडे पाहात नाही. सभा असली काय, नसली काय, आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही. ते राजकीय आरोप करत राहणार, ते स्वतः बचावासाठी असंच करणार, ते काही साधूसंत नाहीत. त्यांनी आणि पोलिसांनी चौकशी केली पाहिजे की, आव्हान देणारे फलक कोण लावत आहे."

Imtiaz Jaleel vs Sangram Jagtap
Ahilyanagar Muslim mob violence : अहिल्यानगरमध्ये हिंसाचार, चार वेगवेगळ्या फिर्यादी, 290 जणांविरोधात गुन्हे; 'मास्टरमाइंड' गजाआड

...तरी पोलिसांनी धडा शिकवला

'हिंसाचारासाठी जमाव कोणी जमवला. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची नासधूस कोणी केली, पोलिसांच्या अंगावर जाण्याचा कोणी प्रयत्न केला. या सर्वाची चौकशी झाली पाहिजे,' अशी मागणी करताना, हिंसाचार जखमी झालेल्या पोलिसांची बाजू घेताना, 'पोलिस घटनास्थळी लोकशाही मार्गाने वागले. पोलिस तयारीत असते, एकही पोलिस जखमी झाला नसता. पण तिथं ज्याने कायदा हातात घेतला, त्याला धडा शिकवण्याचं काम पोलिसांनी केलं आहे, अशी प्रतिक्रिया संग्राम जगताप यांनी दिली.'

सभा मोठी व्हावी म्हणून राडा...

सभा मोठी होणार होती, त्यामुळे हा पूर्वनियोजित राडा करण्यात आला, असा इम्तियाज जलील यांनी आरोप केला. त्यावर बोलताना संग्राम जगताप म्हणाले, "ही सभा मोठी व्हावी, यासाठी हा प्रयत्न सुरू होता. पण त्यांनी कायदा हातात घेतला. मूळ विषय असा आहे की, आव्हान देणारे फलकासाठी कोणी पुरस्कृत केलं. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे."

आव्हान देणाऱ्या फलकांविरोधात गुन्हा नोंदवा

अहिल्यानगर शहरात एवढा राडा होऊन देखील कोतवाली पोलिस ठाण्याच्या बाहेर लावलेले अन् आव्हान देणारे फलक अजून काढलेले नाहीत. ते काढले गेले पाहिजे. पण फलक लावणारे, छापणारे, त्याला पुरस्कृत करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी प्रमुख मागणी संग्राम जगताप यांनी केली.

ते काही वेगळ्या चळवळीचे नव्हते!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांचा 'AIMIM'मध्ये प्रवेश होणार होते. त्यातून हा राडा झाल्याचे सांगितले जाते. त्यावर बोलताना संग्राम जगताप म्हणाले, "दर निवडणुकीला असे प्रवेश होत असतात. वेगवेगळ्या पक्षांचे लोकं इकडं-तिकडं जात असतात. आचारसंहिता लागल्यावर ते प्रमाण अधिक होईल. पण त्याला फार काही महत्त्व देण्याची गरज नाही. जे जाणार होते, ते काही वेगळ्या चळवळीतील नव्हते. त्याच चळवळीतील होते. त्यामुळे त्यांच्याकडून काही अपेक्षित नाही." नऊ ऑक्टोबरला सभा होत आहे. ती होऊ द्या. पण शहारातील लोकांच्या जीवनावर परिणाम होईल, असे वागू नये, अशी विनंती आमदार जगताप यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com