Sujay Vikhe BJP : 'लोक म्हणतात, आमची चूक झाली, तेव्हा मला खूप आनंद होतो'; सुजयदादा म्हणाले, 'मी मतासाठी लाचार...'

Ahilyanagar BJP Ex-MP Sujay Vikhe Criticizes NCP MP Nilesh Lanke Maharashtra Politics : पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने माजी खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितमध्ये अहिल्यानगरमध्ये दिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि महिला बचत गटांना मोफत सहाय्यक साधनांचे वाटप झाले.
Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar political news : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पुन्हा खासदार होण्याचा निर्धार व्यक्त करताना, खासदार नीलेश लंके यांचे नाव न घेता त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला.

'आपण मतांसाठी लाचार नाही, पण गेल्या वर्षभरात केंद्राचा एकही विकास प्रकल्प अहिल्यानगरमध्ये आला नाही. अशावेळी लोकं मला येऊन भेटतात, अन् चुक झाल्याचं म्हणतात, तेव्हा मला आनंद होतो', असं विधान माजी खासदार सुजय विखेंनी केलं.

भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत अहिल्यानगरमध्ये सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 125व्या जयंतीचा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने दिव्यांग, वरिष्ठ नागरिक आणि महिला बचत गटांना मोफत सहाय्यक साधनांचे वाटप झाले. याशिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी प्रमाणपत्राचे देखील वाटप झाले.

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी यावेळी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, 'जेवढं काम माजी खासदार म्हणून गेल्या वर्षभरात केलं, तेवढं काम विद्यमान परिस्थितीमध्ये पदावर असलेल्यानं देखील केलं नसेल. मला फरक पडत नाही. सत्ता येते, जाते. या मंडपात बसलेले, स्टेजवर देखील बसलेल्यांपैकी कितीजणांनी मला मतदान टाकले हे माहिती नाही. म्हणजे या स्टेजवर देखील, असे लोकं आहेत, त्यांनी मला मतदान टाकले नाही. या मंडपात देखील असे लोकं आहेत, त्यांनी मला मतदान टाकलं नाही. मतदानासाठी सुजय विखे कधीही लाचार होत नाही, असेही त्यांनी म्हटले'.

Sujay Vikhe Patil
Rohit Pawar on BJP morality : अंतुले, आबा, अजितदादांचा दाखला; एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवरून रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

आनंद कधी वाटतो मला माहिती आहे का? असे सांगताना विखे पाटील म्हणाल, 'जेव्हा लोकं मला येऊ भेटतात, आणि म्हणतात, आमची फार मोठी चूक झाली. मला इतका आनंद होतो की, सांगू शकत नाही'. माजी खासदाराच्या कार्यक्रमाला खुर्च्या पुरत नाही आणि आजी खासदाराच्या कार्यक्रमाला खुर्च्या रिकाम्या राहतात, असा टोला सुजय विखेंनी खासदार लंकेंना लगावला.

Sujay Vikhe Patil
Top 10 News : उद्धव ठाकरेंचा अपमान? 3 नव्या महानगरपालिका होणार, महामंडळाची फसवणूक, वाचा Top-Ten राजकीय घडामोडी...

'गेल्या वर्षभरात एकही केंद्रीय प्रकल्प या जिल्ह्यांमध्ये आला नाही. अहिल्यानगर शहरात एकही विकासकामांचा नारळ फुटला नाही, हे सांगताना माजी चुक एवढीच झाली की, जे लोकं 40 वर्षांपासून अंधारात होते, त्यांना उजेडात आणण्याचा प्रयत्न केला. जे लोकं 40 वर्षांपासून प्रकल्पाच्या प्रतिक्षेत होते, ते वेळेअगोदर मी पूर्ण केले. मला माहिती आहे की, मी काय करू शकतो अन् आजही करत राहणार आहे', असा निर्धार सुजय विखेंनी व्यक्त केला.

मी थांबणार नाही, अहिल्यानगरच्या जनतेच्या सेवेमध्ये माझं अविरत आयुष्य खर्च करायला तयार आहे. खर्च करून तुमच्यामध्ये परत येऊन तुमच्याच मताने परत खासदार होणार, हा शब्द मी तुम्हाला देतो. ना आपण कुठं गेलोय, ना कुठे पळून जाणार, ठामपणे आपली भूमिका मांडणार, सर्व सामान्यांचे प्रश्न मांडणार, असा निर्धार व्यक्त करताना, खासदार होण्याचा पुन्हा निश्चय केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com