
BJP minister aide crime news : भाजपचा सभापती, मंत्री, नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये उठबस करणारा खंडणीखोर निघाला आहे. कर्जत पोलिस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल झाला असून, शंकरराव राजेभोसले ऊर्फ शहाजी असे अटक केलेल्याचे नाव आहे.
तसेच त्याचा वकिली करणारा भाऊ युवराज राजेभोसले आणि इतर आठ जणांविरुद्ध कर्जत पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. शंकरराव राजेभोसले याला न्यायालयाने चार जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राशीन (ता. कर्जत) इथं प्रोजेक्ट कंपनीचे कामात कमिशनची मागणी करत, त्याच्या वसुलीसाठी धमकल्याचा आरोप शंकरराव राजेभोसले आणि त्याच्या सहकाऱ्यावर आहे. हा प्रोजेक्ट महाराष्ट्र (Maharashtra) वीज निर्मिती योजने अंतर्गत रॅनसन सोलर पल्स या कंपनीचा आहे. राजेभोसले याच्या राशीनच्या राजेवस्ती इथल्या जागेत होत आहे.
या कंपनीकडे शहाजी राजेभोसले याने वारंवार 12 टक्के कमिशनची मागणीचा तगादा सुरू ठेवला होता. कंपनीने विनाकारण कमिशन देणार नसल्याची भूमिका घेतली. राजेभोसले याच्या मागणीकडे कंपनीने नंतर दुर्लक्ष करण्यास सुरवात केली. यानंतर राजेभोसले याने दहशत निर्माण करण्यास सुरवात केली.
कंपनीच्या प्रोजेक्टचे काम बंद पाडण्याचा प्रकार केले. तसेच कामाच्या साहित्याची जेसीबी मशीन घुसवून नासधूस केली गेली. 29 जूनला सकाळी साडेदहा वाजता जेसीबी मशीनने, काम सुरू असलेल्या ठिकाणचे बसविण्यात आलेले सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्याची तोडफोड केली. यासह सुरक्षा रक्षकास धमकावत दोन पोल पाडून कॅमेरे काढून घेऊन गेला.
कंपनीचे सुनीलकुमार तिवारी आणि रमेशकुमार शहा यांनी झालेल्या तोडफोडीची माहिती पोलिसांना दाखवण्यासाठी सोमवार दुपारी गेले होते. तिथे युवराज राजेभासले आणि त्याच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी फिर्यादी वसीम नौशाद शेख यांच्यासोबत असणारे तिवारी व शहा यांना लाकडी काठ्या, लोखंडी रॉड, लोखंडी चैन, कुदळच्या फायबर दांड्याने मारहाण केली.
सुनीलकुमार यांचा मोबाईल, कारची चावी आणि अंदाजे 25 हजारांची रोख रक्कम काढून घेतल्याची वसीम नौशाद शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कर्जत पोलिस ठाण्यात बीएनएस कलम 308(3)(4)(5), 118(1), 115(2), 119 (1), 189(2), 190, 191(2)(3), 324(4), 49, 351(3) या प्रमाणे शंकरराव राजेभोसले ऊर्फ शहाजी, युवराज राजेभोसले, गुटाळ (पूर्ण नाव माहीत नाही) यासह 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट आणि उपनिरीक्षक प्रदीप बोऱ्हाडे तपास करीत आहे. शंकरराव राजेभोसले याला पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते. सरकारी पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याची चार जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान, शंकरराव राजेभोसले याची भाजप मंत्री, नेते, पदाधिकारी यांच्यामध्ये उठबस आहे. या राजकीय पाठबळामुळे कर्जत पोलिस देखील या गुन्ह्याविषयी दबकतच माहिती देत होते. राजकीय नेत्यांकडून अडचण नको, म्हणून खासगीत सांगत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.