
Shrirampur political news : श्रीरामपूर इथल्या एका कार्यक्रमानिमित्ताने भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव आमदार हेमंत ओगले एकत्र आले होते. आमदार ओगले यांनी 'श्रीरामपूरवर सदैव प्रेम राहू द्या', असं मंत्री विखे पाटलांना म्हटलं होतं. मंत्री विखे पाटलांनी देखील, 'विकासकामांसाठी एकत्र आलं पाहिजे, तुम्ही चुकीच्या लोकांसोबत राहू नका. राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे', असे म्हणत सहकार्यासाठी सूचक संकेत दिले.
यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेसचा एकमेव आमदार हेमंत ओगले यांच्या भूमिकेविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर आमदार ओगले यांनी, 'आम्ही चुकीच्या लोकांच्या संगतीत नाही, तर फक्त विकासाच्या सोबत आहोत', असे स्पष्टीकरण दिले आहे.
श्रीरामपूर इथल्या कार्यक्रमात भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांना, 'तुम्ही चुकीच्या लोकांसोबत राहू नका. विकासासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. कारण जनतेचा फायदा हाच खरा राजकारणाचा हेतू असतो, असे सांगत, स्वच्छ राजकारणाचे संकेत दिले'. यानंतर अहिल्यानगरमधील काँग्रेसचे एकमेव आमदार हेमंत ओगले यांच्या भूमिकेविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. आमदार ओगले यांनी मंत्री विखे पाटलांच्या या विधानाला सूचक असं प्रत्युत्तर दिलं आहे.
"आम्ही चुकीच्या लोकांच्या संगतीत नाही, आम्ही विकासाच्या सोबत आहोत," असा ठाम शब्दात खुलासा काँग्रेस (Congress) आमदार हेमंत ओगले यांनी केला. मंत्री विखे पाटलांना "तुम्ही चुकीच्या लोकांसोबत राहू नका" या सूचक सल्ल्याला ओगले यांचं हे प्रत्युत्तर श्रीरामपूर बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेतून दिलं आहे.
"सिद्धार्थ मुरकुटे, करण ससाणे, सचिन गुजर यांसारख्या लोकांच्या सोबत राहिलो म्हणूनच विधानसभेत निवडून आलो. ते चांगले नसते, तर ही यशाची पायरी गाठता आली नसती. विकासासाठी कोणीही हात पुढे केला, तर आम्ही तो नक्की धरू, पण बाकी बाबतीत मात्र भूमिका ठामच राहील", असेही आमदार ओगले यांनी म्हटले आहे.
बाजार समितीविषयी बोलताना ओगले यांनी "चांगले काम करणाऱ्याला संघर्ष करावा लागतो. समितीच्या विरोधात 16 याचिका दाखल झाल्या, पैकी 13 याचिकांचा निकाल आमच्या बाजूने लागला. सभापती सुधीर नवले यांच्या पाठीशी आम्ही आहोत. वेळ पडल्यास कोणाच्या पाया पडावे लागले तरी मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयाच्या विषयावर बोलताना ओगले यांनी, "श्रीरामपूरचे उपजिल्हा रुग्णालय राज्यात आदर्शवत आहे. त्याची स्वच्छता अनेक खासगी रुग्णालयांनाही लाजवेल." बाजार समितीने स्वतंत्र रुग्णालय उभारावे का? याबाबत चर्चा रंगली. ओगले यांनी "अशोक कारखान्याने पुढाकार घेतल्यास आम्हीही पाऊल उचलू." यावर सिद्धार्थ मुरकुटे यांचा उल्लेख करत 'वकिली करावी' असा टोला ओगले यांनी मारला. त्यावर मुरकुटे यांनी कानावर हात ठेवत, "माझा व कारखान्याचा काही संबंध नाही, तुम्ही वडीलांशी बोला," असे म्हणत वातावरण हलकं-फुलकं केलं.
सभेत भाऊसाहेब पारखे यांनी जिल्हा परिषद बेलापूर गटातून काँग्रेसकडून तिकीट मिळावे, अशी थेट मागणी केली. "जर तिकीट नाही दिले, तर (कै.) जयंतराव ससाणे यांचा फोटो लावून प्रचार करेन," असे स्पष्ट शब्दांत सांगताना त्यांनी पक्षश्रेष्ठींनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून दूर असल्या तरी, काही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असल्याचे या विधानावरून स्पष्ट झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.