Manikrao Kokate rummy video : अजितदादांच्या शिलेदारांची बात कुछ हजम नहीं हुई; कोकाटे म्हणताय 'जाहिरात स्कीप' करत होतो, तर जगतापांनी 'AI'वर ढकललं...

Minister Manikrao Kokate Rummy Video NCP MLA Sangram Jagtap Reacts : मंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रम्मी खेळतानाच्या व्हिडिओवर अहिल्यानगरमधील एनसीपी आमदार संग्राम जगतापांनी सावरासावर केली.
MLA Sangram Jagtap
MLA Sangram JagtapSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar political news : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रम्मी खेळण्याच्या व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी समाज माध्यमांद्वारे समोर आणला. यावरून राज्याच्या राजकारणात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मंत्री कोकाटे यांनी जाहिरात स्कीप करत होतो, असे म्हटले असतानाच, आमदार संग्राम जगताप यांनी 'AI'द्वारे आता कसेही व्हिडिओ बनवता येऊ शकतात, त्याची सत्यता पडताळली पाहिजे, अशी प्रतिक्रिया देत सावरासावर केली आहे.

मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळण्याच्या व्हिडिओवरून चौहू बाजूने टीका होत आहे. विरोधक तुटून पडले आहेत. यातच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी या व्हिडिओवर दिलेली प्रतिक्रिया देखील चर्चेत आहे.

'या व्हिडिओची (Video) वास्तविकता पडताळणी केली पाहिजे. 'AI'द्वारे अनेक व्हिडिओ तयार करता येतात, हे देखील आपण पाहिलं आहे. याबाबतची सत्यता पडताळणी केली पाहिजे. हा व्हिडिओ खरा आहे, जोपर्यंत सिद्ध होत नाही, तोपर्यंत यावर कोणी प्रतिक्रिया द्यावी, असं वाटत नाही. व्हिडिओतील माणूस जरी खरा असला तरी मोबाईलवर जे दिसतय ते खरं आहे की नाही हे देखील तपासले पाहिजे', असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.

MLA Sangram Jagtap
Rohit Pawar FIR Mumbai : रोहित पवार यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल; पोलिसांशी गैरवर्तनाचा ठपका

दरम्यान, मंत्री कोकाटे यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, 'विधान परिषदेतील हा व्हिडिओ असावा. सभागृहात सीसीटीव्ही आहेत. सभागृहाचे नियम मला माहीत आहे. त्यामुळे मी असं काही करू शकत नाही. सभागृह स्थगित झाले होते. तेव्हा वरिष्ठ सभागृहात काय चालले आहे हे युट्यूबवर पाहण्यासाठी मी फोन सुरू केला होता. तेव्हा जंगली रम्मीची जाहिरात समोर आली. मी लगेच ती स्कीप करत होतो. त्यावेळचा तो व्हिडिओ आहे. 10 ते 12 सेकंदांचा तो व्हिडिओ आहे. जाहिरात स्कीप होत नव्हती तेव्हा मी दोन तीनवेळा प्रयत्न केला. आणि जाहिरात स्कीप केली.'

MLA Sangram Jagtap
Thackeray BJP meeting : ठाकरे-फडणवीसांच्या भेटी शिंदेंच्या शिवसेनेला झोंबतेय; सरनाईकांनी पळ काढणारे अन् संधीसाधू म्हणत डिवचले!

मंत्री कोकाटे रम्मी खेळताना व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यास ज्यांना काय समजायचे, ते समजून जाते आणि कोकाटे यांची बाजू सांभाळून घेताना, आमदार जगताप यांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे, 'बात कुछ हजम नहीं हुई', असेच आहे, अशी चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com