Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat : '...अन् शत्रू बेसावध राहिला, मग घरात घुसून पराभव केला'; सुजय विखेंनी थोरातांच्या पराभवामागील रणनीती सांगितली

Ahilyanagar BJP Leader Sujay Vikhe Criticizes Sangamner Congress Leader Balasaheb Thorat : भाजप माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेरमधील आश्वी बुद्रुक दौऱ्यात बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर भाष्य करत डिवचलं.
Sujay Vikhe and Balasaheb Thorat
Sujay Vikhe and Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar BJP vs Congress : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. शेजारचा कारखाना कामगारांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील माहिती गोळा करत होता.

यातूनच शत्रू बेसावध राहिला. परिणामी शत्रुच्या घरात घुसून त्यांना पराभूत करणे सोपे झाले, असा टोला विखे पाटलांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना लगावला. पण आता निवडणूक संपली आहे. मनात कोणतेही आता शत्रुत्व नाही, असेही विखे पाटलांनी स्पष्ट केले.

सुजय विखे पाटील आश्वी बुद्रुक दौऱ्यावर होते. डाॅ. विखे पाटील कारखान्याच्या नवीन संचालकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ नेते शाळिग्राम होडगर अध्यक्षस्थानी होते. सुजय विखे पाटील यांनी गणेश सहकारी साखर कारखाना आणि लोकसभा निवडणुकीत पराभवावर भाष्य करताना, त्याची परतफेड कशी केली, यावरून काँग्रेसचे (Congress) बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला.

भाजपचे सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) म्हणाले, "शेजारचा कारखाना आपल्या मतदारसंघातील माहिती कामगारांच्या माध्यमातून गोळा करत होता. त्यामुळे बेसावध असलेल्या शत्रुच्या घरात घुसून त्यांचा पराभव करणे सोपे झाले. पण आता निडवणूक संपली आहे. आमच्या मनात कोणतेही शत्रुत्व नाही". लढाई ही व्यक्तीशी नव्हे, तर विचारांशी होती. आता जनतेने देखील मताधिक्य देऊन राधाकृष्ण विखे पाटलांना विधानसभेत पाठवले आहे, असेही विखे पाटील यांनी म्हटले.

Sujay Vikhe and Balasaheb Thorat
Chief Justice Bhushan Gavai - मुख्यमंत्र्यांचा आदेश अन् सरन्यायाधीशांच्या स्वागताला झाडून सगळे अधिकारी विमानतळावर हजर!

बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यात असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर भाष्य केले. शेजारील संगमनेर कारखाना निवडणूक प्रक्रियेत दोनशे अर्ज, नाराजीनाट्य, संन्यास घेण्याची भाषा होती. पण पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, कै. बाळासाहेब विखे पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कारखान्याच्या सभासदांचा विश्वास संपादन केल्याने तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 21 अर्ज आल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Sujay Vikhe and Balasaheb Thorat
Maharashtra Politics Update - ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचाही पाठिंबा

विधानसभा 2029च्या निवडणुकीपूर्वी निळवंडे कालव्याच्या पाण्यापासून एक स्क्वेअर फूट जागा देखील आपण वंचित ठेवणार नाही, अशी ग्वाही सुजय विखे पाटील यांनी यावेळी दिली. तसेच भोजापूर चारी आणि साकुर उपसा योजनेचे भूमिपूजन करणार नाही, तोपर्यंत संगमनेर तालुक्यात सत्कार स्वीकारणार नसल्याचा पुनरुच्चार सुजय विखे पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com