Shripad Chindam : ‘शिवद्रोही’चा शिक्का, तरीही छिंदमची धडाक्यात शिवजयंती! जगतापांचा फोटो असलेल्या फलकानं वातावरण तापवलं?

Ahilyanagar BSP corporator Shripad Chindam celebrated Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti at Delhi Darwaja, where a banner featuring MLA Sangram Jagtap has sparked political discussion : छत्रपतींविषयी अपमानास्पद विधान करणारा शिवद्रोही अहिल्यानगरमधील बसपचा नगरसेवक व त्याच्या भावाने दिल्ली दरवाजा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य-दिव्य देखावा उभाराला होता.
Shripad Chindam
Shripad ChindamSarkarnama
Published on
Updated on

Shivaji Maharaj Jayanti controversy : भाजपकडून उपमहापौर असताना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणारा अन् आता बसपाचा नगरसेवक असलेला शिवद्रोही श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम याने अहिल्यानगरमध्ये इथं दिमाखात शिवजयंतची साजरी केली.

अहिल्यानगर शहराचा रहदारीचा प्रमुख रस्त्यावर भव्य-दिव्य देखावा उभारून, सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर याच परिसरात अजित पवार राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा गळ्यात भगवा पंचा घेतलेला फोटो असलेल्या फलक अन् त्यावरील मजकूर चर्चेचा विषय ठरला आहे. 'तो प्रत्येक आवाज चिरडला जाईल, जो छत्रपतींच्या विरोधात जाईल,' असा फलकावर मजकूर लिहित सूचक इशारा दिला आहे. जगताप यांचा हा फलक संपूर्ण नगर शहरात शिवद्रोही साजरी करत असलेल्या शिवजयंतीच्या ठिकाणीच उभारला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची तिथीनुसार राज्यात जयंती साजरी केली जात आहे. अहिल्यानगरमध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे. शिवप्रेमी छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी रस्त्यावर उतरले असतानाच, शिवद्रोही श्रीपाद छिंदम अन् त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम याने, दिल्ली दरवाजा शिवजयंतीनिमित्ताने भव्य-दिव्य देखावा उभारला आहे.

छिंदम बंधूंनी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक प्रतिष्ठाण स्थापन केलं आहे. या प्रतिष्ठाणचा मोठा फलक उभारला असून, त्यावर सुरवातीला संस्थापक अध्यक्ष श्रीपाद छिंदम याचे नाव होते. त्यावरून वाद पेटला. शिवद्रोहीने शिवजयंती साजरी करून नये, यासाठी शिवप्रेमी, हिंदू सकल संघटना आणि सकल मराठा समाज समोर आला. यानंतर शिवप्रेमींनी दिल्ली दरवाजा परिसरात जमण्याचा इशारा दिला. तत्पूर्वी फलकावरील श्रीपाद छिंदम याचे नाव हटवून, त्याचा बंधू श्रीकांत छिंदम याचे नाव प्रतिष्ठाणला संस्थापक अध्यक्ष म्हणून लावण्यात आले.

Shripad Chindam
Sagar Moholkar attack : ...दहा पोलिसही थरथरायचे! 'त्या' सागर मोहोळकरावर दोघांनी झाडल्यात गोळ्या!

दरम्यान, छिंदम बंधू ज्या परिसरात, दिल्ली दरवाजा इथं शिवजंयती साजरी करत आहे, तिथं अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचा फोटो असलेला, सूचक फलक लावला आहे. 'या फलकावर तो प्रत्येक आवाज चिरडला जाईल, जो छत्रपतींच्या विरोधात जाईल,' असा सूचक इशारा देणार मजकूर लिहिला आहे. या फलकावर एका बाजूला छत्रपतींचा, तर दुसऱ्या बाजूला आमदार संग्राम जगताप यांचा गळ्यात भगवा पंचा घातलेला फोटो आहे.

Shripad Chindam
Bachchu Kadu Trishul Warning : बच्चू कडूंचा आक्रमक अवतार! हातात त्रिशूळ घेऊन ‘तांडव’चा इशारा, संघर्ष यात्रेची धार वाढली

पोलिसांनी संपूर्ण शहरात बंदोबस्त वाढवला

आमदार जगताप यांचा हा फलक बरोबर छिंदम बंधूंनी उभारलेल्या भव्य-दिव्य देखाव्यासमोर उंचावर उभारला आहे. सायंकाळी तरुण मंडळाच्या मिरवणुका याच मार्गावरून जाणार आहे. या परिसरात तणावाचा वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे परिसरासह संपूर्ण शहरातील पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

छिंदमला पुसायचाय शिवद्रोहीचा डाग

बसपमध्ये जाऊन पुन्हा नगरसेवक झालेला श्रीपाद छिंदम हा 2018 मध्ये भाजपकडून नगरसेवक पदावर विजयी झाला होता. त्यावेळी तो उपमहापौरपदावर होता. महापालिकेच्या कर्मचाऱ्याशी बोलताना, त्याने छत्रपतींविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानानंतर संपूर्ण राज्यात शिवप्रेमींमध्ये उद्रेक उफाळला होता. श्रीपादला भाजपमधून निलंबन झाले. तुरुंगात जावे लागले. नगरसेवक पदावर गडांतर आले. पण तो निवडणुकीला उभा राहून जिंकून येतोच. यंदाच्या निवडणुकीत बसपकडून उमेदवारी घेत विजयी झाला आहे.

आमदारांचा छिंदम सूचक इशारा?

आपल्या नावसमोरील शिवद्रोहीचा शिक्का पुसरण्यासाठी त्याने सुरवातीला या विधानानंतर माफी मागितली होती. परंतु, शिवप्रेमी अजूनही त्याच्यावर नाराज आहेत. हा शिक्का पुसण्यासाठीच छिंदम बंधूंचे प्रयत्न सुरू आहेत. पण आता अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक हिंदुत्व स्वीकारलं आहे. आणि जगतापांनी छिंदम ज्या परिसरात, दिल्ली दरवाजा इथं शिवजयंती साजरी करत आहे, तिथं सूचक फलक लावला आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com