Bachchu Kadu Trishul Warning : बच्चू कडूंचा आक्रमक अवतार! हातात त्रिशूळ घेऊन ‘तांडव’चा इशारा, संघर्ष यात्रेची धार वाढली

Sangharsh Yatra in Melghat, Amravati, MLA Bachchu Kadu warned the government and administration of a fierce agitation over farmers issues, symbolically holding a trident : अमरावती मेळघाट इथं बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या संघर्ष यात्रेचा आज सहावा दिवस असून, बच्चू कडू यांनी हातात त्रिशूळ घेतला आहे.
Bachchu Kadu Trishul Warning
Bachchu Kadu Trishul WarningSarkarnama
Published on
Updated on

Bachchu Kadu Melghat Sangharsh Yatra : माजी बच्चू कडू यांच्या संघर्ष यात्रेला, आता तीव्र धार चढली आहे. यात्रेचा सहावा दिवस असून, बच्चू कडू यांनी आता थेट हातात त्रिशूल घेतलं आहे.

"सरकार अन् प्रशासन पाहिजे तशा पद्धतीत जस समोर आलं नाही, आम्ही नऊ तारखेला तहसील कार्यालयात हजारो त्रिशूळ घेऊन, तांडव नृत्य केल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांच्या या इशाऱ्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीच्या (Amravati) मेळघाटमध्ये 250 किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. आज त्यांच्या पदयात्रेचा आज सहावा दिवस आहे. आतापर्यंत बच्चू कडू यांनी तब्बल 180 किलोमीटरचा प्रवास केला आहे. नऊ तारखेला सलोना ते चिखलदरा, असा बच्चू कडू यांचा विराट मोर्चा असणार आहे.

बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आता स्वत: पदयात्रेमध्ये शंकर महादेवाचा त्रिशूळ हातात घेतला आहे. तसंच यात्रेत सहभागी झालेल्या शेतकरी, कार्यकर्त्यांनी देखील हातात त्रिशूळ घेत, तांडव करण्याचा सरकार अन् प्रशासनाला इशारा दिला आहे. यामुळे प्रशासन अलर्ट झालं आहे.

Bachchu Kadu Trishul Warning
Sagar Moholkar attack : ...दहा पोलिसही थरथरायचे! 'त्या' सागर मोहोळकरावर दोघांनी झाडल्यात गोळ्या!

सरकार अन् प्रशासनाने मेळघाटामधील शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल न घेतल्यास, नऊ तारखेला तहसील कार्यालयात शंकर महादेवाचे हजारो त्रिशूळ घेऊन तांडव करणार आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Bachchu Kadu Trishul Warning
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या आदेशाने सांगली 'ZP' हादरली! 13 शिक्षकासह एक कर्मचारी निलंबित; दिव्यांग प्रमाणपत्राबाबत "नो एक्सक्यूज"

कर्जमाफीची करून दिली आठवण

मेळघाटातील मुलभूत सुविधा, तसंच शेतकऱ्यांना 31 जून पूर्वी कर्जमाफी करू, असं दिलेलं आश्वासनाची आठवणही बच्चू कडू यांनी या पदयात्रेत करून दिली. मेळघाट मधील आदिवासी बांधव सुद्धा बच्चू कडू यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीने पदयात्रेत सहभागी झाले आहेत.

बच्चू कडू यांचा इशारा

बच्चू कडू म्हणाले, "सरकार अन् प्रशासन पाहिजे तशा पद्धतीत जस समोर आलं नाही, आम्ही नऊ तारखेला तहसील कार्यालयात हजारो त्रिशूळ घेऊन, तांडव नृत्य केल्याशिवाय राहणार नाही. मेळघाटमधील आदिवासीसह शेतकऱ्यांचा सत्यानाश केला. तोच शेतकरी शंकर महादेवाचा त्रिशूळ घेऊन तहसीलमध्ये तांडव नृत्य करेल."

मुक्कामाच्या तयारीनं मोर्चात सहभागी व्हा...

आठ तारखेपर्यंत सरकार अन् प्रशासनाने निर्णय घेतला पाहिजे. यानंतर नऊ तारखेला लाखो लोकांनी हातात त्रिशूळ घेऊन तहसील कार्यालयावरील विराट मोर्चात सहभागी व्हा. सोबत एक चादर घ्या. वेळप्रसंगी तहसील कार्यालयात मुक्कामाची वेळ येईल. बोल हर हर महादेव, अशी घोषणा बच्चू कडू यांनी देत पदयात्रेतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com