Ahilyanagar fake currency case : सराईत गुन्हेगारांनी थाटला बनावट नोटांचा छापखाना; पोलिसांना भनक अन्...

Ahilyanagar Rahuri Police Arrest Three for Printing Fake Currency Says SP Somnath Gharge : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी बनावट नोटा छापण्याचं मोठं रॅकेट उघड केल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमानाथ घार्गे यांनी दिली.
Ahilyanagar fake currency case
Ahilyanagar fake currency caseSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar crime news : राहुरी पोलिसांनी बनावट नोटा छापण्याचं मोठं रॅकेट उघड केलं आहे. कारवाईत टेंभुर्णी इथून सुमारे 66 लाख रुपयांच्या बनावट नोटा व पाच लाखांचे साहित्य जप्त केलं आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.

बनावट नोटा छापणारे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी पाचशे व दोनशेच्या 66 लाख रुपयांच्या हुबेहुब बनावट नोटा छापल्या होत्या. दरम्यान, या नोटा चलनात आल्या की नाही, याचा तपास पोलिस करत आहेत.

या बनावट नोटांच्या रॅकेटबाबत पोलिस (Police) अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राहुरी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत पप्पू ऊर्फ प्रतीक भारत पवार (वय 33, रा. सोलापूर), राजेंद्र कोंडिबा चौघुले (वय 42, रा. कर्जत जि. अहिल्यानगर) व तात्या विश्वनाथ हजारे (वय 40, रा. पाटेगाव ता. कर्जत) या तिघांना ताब्यात घेतलं आहे.

निरीक्षक संजय ठेंगे व त्यांचे पथक शनिवारी (ता. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास राहुरी (Rahuri) शहरात पेट्रोलिंग करत होते. या वेळी ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, तिघेजण दुचाकीवरून अहिल्यानगर इथून राहुरीकडे बनावट नोटा घेऊन येत आहेत. ठेंगे यांनी तत्काळ पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

Ahilyanagar fake currency case
Sujay Vikhe Sangram Jagtap alliance : 'संग्राम मला ओव्हरटेक करून गेला'; अजितदादांच्या आमदाराला विखेंचं 'पाॅवरफूल' पाठबळ

राहुरी शहरात अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सरकारी पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या. ठेंगे यांनी ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापक कैलास वाणी यांना बोलावून या नोटा तपासल्या असत्या त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

Ahilyanagar fake currency case
Maharashtra Live Updates : पाच जुलैला मोर्चाऐवजी जल्लोष अन् सभा होणार; उद्धव ठाकरे यांची माहिती

नोटा छापण्याचं साहित्य जप्त

आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती दिली. ते शीतलनगर, टेंभुर्णी या ठिकाणी या बनावट नोटा तयार करत होते. पथकाने संबंधित ठिकाणी समाधान गुरव यांच्या इमारतीमधून झेरॉक्स मशिन, प्रिंटर, कटिंग मशिन, नोटा बनविण्यासाठीचा कागद, नोटा मोजण्याचे मशिन, लॅमिनेशन मशिन, कंट्रोलर युनिट, असे पाच लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.

सराईत गुन्हेगार

आरोपींविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध कुडूवाडी पोलिस ठाणे, सोलापूर इथं गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी 22 महिने तुरुंगातही होते. ही कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, सूरज गायकवाड, राहुल यादव, विजय नवले, संदीप ठाणगे, सतीश कुऱ्हाडे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, गणेश लिपणे आदींनी केली.

टेंभुर्णीमध्ये छापखाना

आरोपींनी टेंभुर्णी इथं घर भाडोत्री घेऊन बनावट नोटांचा छापखाना सुरू केला होता. राहुरी पोलिसांनी टेंभुर्णी इथं जाऊन संबंधित ठिकाणाहून 37 लाख 50 हजार रुपये किमतीच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचे एकूण 75 बंडल, 8 लाख 80 हजार रुपये किमतीच्या दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण 44 बंडल, 18 लाख रुपयांच्या पाचशेच्या प्रिंट मारलेले. परंतु कट न केलेले कागदाचे बंडल, असा एकूण 70 लाख 73 हजार 920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com