Sangram Jagtap Won : झुंजवलं तरी जगतापांची सहज हॅटट्रिक; आता 'वेध' मंत्रीपदाचे!

NCP Sangram Jagtap Won Ahilyanagar City Assembly Election 2024 final result : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्यात थेट लढत झाली.
Sangram Jagtap
Sangram JagtapSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar City Assembly Constituency Result 2024 : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात चुरस निर्माण झालेल्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. महाविकास आघाडीच्या एकसंघ होती, परंतु सूक्ष्म नियोजनामुळे आमदार जगताप यांनी सहज विजय मिळवला.

पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या संग्राम जगताप यांना 1 लाख 17 हजार 55 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांचा पराभव झाला. त्यांना 78 हजार 255 मते मिळाली. आमदार जगताप यांचा 39 हजार 650 मतांनी विजय झाला. आमदार जगताप यांची ही हॅटट्रिक त्यांची मंत्रीपदावर वर्णी लावणार, अशी चर्चा आता रंगली आहे.

अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) उमेदवार आमदार संग्राम जगताप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्यात सरळ लढत होती. जगताप यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आल्याचे चित्र होते. आमदार जगताप यांनी मागील दोन टर्म गाजविल्या. गेली दोन टर्म सत्ता काबिज केल्यानंतर आमदार जगताप यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा केला. तिसऱ्या टर्मसाठी जगताप यांनी गेल्या दोन वर्षांपासून जोरात तयारी केली. उलट महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार कळमकर यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली. त्यामुळे त्यांना नियोजन करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. असे असले, तरी जगताप विरोधकांना एकत्र करून मोट बांधण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न केला.

Sangram Jagtap
Ahilyanagar Election Results 2024 LIVE Counting : 'मविआ'चे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात पिछाडीवर; खेम्यात भयाण शांतता

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत काळे आणि माजी महापौर भगवान फुलसौंदर, भाजपचे (BJP) वसंत लोढा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. अहिल्यानगर शहरातील या राजकीय घमासान आमदार जगताप यांना आव्हान मिळाली होते, ते माजी महापौर संदीप कोतकर यांच्याकडून. त्यांनी उमेदवारीचे सुतोवाच केले. तसे शक्तिप्रदर्शनही केले होते. महाविकास आघाडीकडून कोतकर यांनाच तिकिट मिळेल, अशा चर्चा होती. त्यांच्यावरील गुन्ह्यांमुळे निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणींमुळे शेवटी कोतकरांना अर्ज भरता आला नाही. परंतु त्यांच्या पत्नी आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे कन्या सुवर्णा कोतकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी देखील अर्ज मागे घेतला.

Sangram Jagtap
Rohit Pawar : भाजप नेत्यांची भाषा घसरली, आमदार पवारांनी टायमिंग साधलं अन् VIDEO शेअर केला

सुळे अन् लंकेंचे बळ

या सर्व राजकीय घडमोडीनंतर आमदार जगतापांना सोपी वाटत असलेली लढाई शेवटच्या टप्प्यात अवघड झाली होती. त्यामुळे वारं 'तुतारी'च्या बाजुने फिरले होते. अभिषेक कमळकर यांनी चांगले आव्हान उभं केले होते. मविआचे नगर शहरातील सर्व नेते एका छताखाली आले होते. या नेत्यांना पहिल्यापासून खासदार नीलेश लंके आणि शेवटच्या टप्प्यात खासदार सुप्रिया सुळेंकडून भरपूर ताकद मिळाली. यामुळे आमदार जगताप यांना सोपी वाटत असलेली लढाई आव्हानात्मक झाली.

जगतापांसमोर भाजप घायाळ

आमदार जगताप यांनी पहिल्यापासून तयारी केली असल्याने, उत्कृष्ट संघटन कौशल्याच्या जोरावर अवघड वाटणारी लढाई सोपी करण्याचा प्रयत्न केला. यात दमछाक झाली. यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला भाजपच कधीच मतदान करत नाही, असा इतिहास आहे. हा इतिहास पुसून टाकण्यासाठी त्यांनी राजकीय सारिपाटावरील सोंगट्या फिरवल्या. भाजपचे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव भाजपचे युवा नेते तथा माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचं बळ मिळवलं. यामुळे भाजपमध्ये एक मेसेज गेला अन् त्याचा फायदा आमदार जगताप यांनी घेण्याचा कौशल्यपूर्वक प्रयत्न केला.

2019 आणि 2014 राजकीय परिस्थिती

अहिल्यानगर शहर मतदारसंघ पूर्वीचा अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे संग्राम अरुणकाका जगताप 81 हजार 217 मते घेत विजय मिळवला होता. शिवसेनेचे अनिलभैय्या रामकिसन राठोड यांचा पराभव झाला होता. अनिलभैय्या यांचा 11 हजार 139 मतांनी पराभव झाला होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप 49 हजार 378 मतांनी मिळवून विजयी झाले.

या निवडणुकीतही अनिलभैय्या यांचा 3 हजार 317 मतांनी पराभव झाला होता. ही विधानसभा निवडणूक २०२४ ची खूप वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे झालेले दोन पक्ष महायुती आणि महायुतीमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात काय होणार? याची उत्सुकता आहे. या मतदारसंघात माळी, मराठा, मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचं मोठं वर्चस्व आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com