Rohit Pawar : भाजप नेत्यांची भाषा घसरली, आमदार पवारांनी टायमिंग साधलं अन् VIDEO शेअर केला

Ram Shinde Controversial language Rohit Pawar Shares Video: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात 'कांटे की टक्कर', अशी लढत होत आहे.
Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यातील 'कांटे की टक्कर' चांगलीच रंगली आहे.

एकमेकांवर टोकाचे टीकेचे बाण सोडत असताना भाजप नेत्यांची भाषा घसरल्याचे दिसते. याचे टायमिंग साधत आमदार पवार यांनी भाजप नेत्यांची भाषा कशी घसरली, याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत चांगलेच सुनावले.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर व्हिडिओ शेअर करत, भाजप उमेदवाराच्या भाषेवर शेलक्या शब्दात टीका केली. शिक्षक पिढी घडवत असतात. पण यातले तीन कथिक प्राध्यापक आणि एक नेता... यांची ही सुसंस्कृत भाषा बघा. या ठगांची ही भाषा ऐकून यांच्या घरच्या आई-बहिणींनाही लाज वाटली असेल. मी जे म्हणतो, यांना कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज आणायचं, त्याचाच हा ट्रेलर आहे. पण मला विश्वास आहे, यांचा पिक्चर कर्जत-जामखेड स्वाभिमानी जनता फ्लाॅप केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

Rohit Pawar
Ram Shinde : कोट्यधीश भाजप उमेदवार आमदार शिंदे झाले 'ट्रोल'; आमदार पवारांनी देखील साधलं टायमिंग

या व्हिडिओतील भाषा पाहून व्हिडिओ शेअर करायल देखील लाज वाटत होती, असेही आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. पण यांची लायकी जगाला कळावी यासाठी नाईलाजाने आणि अत्यंत दुःखद अंतःकरणाने मी हा व्हिडिओ शेअर करतोय, असेही आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Rohit Pawar
Ajit Pawar : अजित पवारांचे शरद पवारांना सडेतोड उत्तर, "फक्त आदिवासी म्हणून झिरवाळांना ठोकू नका"

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये भाजप (BJP) उमेदवार आमदार प्रा. राम शिंदे, भाजप नेते पाशा पटेल आणि आणखी एका नेत्याचा आहे. या तिघांच्या तोंडातून शिवराळ भाषा ऐकायला मिळते, असा हा व्हिडिओ आहे. पाशा पटेल यांची भाषा ऐकवत नाही. त्त्यांनी त्यांच्या भाषणात म्हतारी-म्हतारीचा किस्सा वेगळ्याच पद्धतीने रंगवून सांगितला आहे.

विधानसभा निवडणूक 2019मधील पराभवचा वचपा आमदार प्रा. राम शिंदे यांना घ्यायचा आहे. यासाठी त्यांनी मतदारसंघात जोरदारा फिल्डिंग लावली आहे. आमदार रोहित पवार यांनी देखील कोणत्याही परिस्थिती गड साबूत ठेवायचा, यासाठी संपूर्ण ताकदपणाला लावली आहे. दोघांचेही निवडणुकीत नियोजन तगडे असल्याने, निवडणूक चुरशीची होऊ लागली आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले असल्याने दोन्ही बाजूने प्रचाराचा धुमधडाका सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com