
Ahilyanagar news : राज्याच्या पावसाळी अधिवेशनात श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत आक्रमक पवित्रा घेत मतदारसंघातील गंभीर समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले.
ड्रग्ज, विजेचा प्रश्न, बोगस बियाणे, सोलर कृषी पंप वाटप, कर्जमाफी आणि पीकविमा यांसारख्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली.
श्रीरामपूर एमआयडीसीत अलीकडेच सापडलेल्या 14 कोटींच्या ड्रग्जसाठ्याचा संदर्भ देत काँग्रेस (Congress) आमदार ओगले म्हणाले, नशेच्या इंजेक्शन्स, वाईटनर आणि गांजाची उघड विक्री चालू आहे. मतदारसंघात ड्रग्जचा सुळसुळाट गंभीर स्थितीकडे निर्देश करतो. याला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम करणं आणि नव्या पोलिस ठाण्याची गरज व्यक्त करताना, देवळाली प्रवरा पोलिस ठाण्याची मागणी हेमंत ओगले यांनी लावून धरली.
महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढताना ओगले म्हणाले, "श्रीरामपूर (Shrirampur) इथं मंजूर असलेले 200केव्हीचे उपकेंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना विजेच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. हे काम तातडीने हाती घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली".
सोलर कृषी पंप आणि बोगस बियाण्यांवरही टीका करत ओगले म्हणाले, अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करूनही सोलर पंप दिले जात नाहीत. बोगस बियाण्यांमुळे शेतकरी अडचणीत आले असून सरकार यावर कठोर पावले उचलणार का, असा प्रश्नही उपस्थित केला.
कर्जमाफी आणि पीकविमा योजनाही घोषणाच राहिल्या असल्याचे सांगताना त्यांनी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचा पीकविम्याचा हप्ता अद्याप न दिल्याची समस्या उपस्थित केली. पीकविम्याचा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या थकीत रकमेबाबत आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत 375 कोटी रुपयांची रक्कम वितरित करण्याचा सरकारी निर्णय झाल्याचा दावा आमदार हेमंत ओगले यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.