Ladki Bahin Yojana News : 'जातीय धुव्रीकरणात, लाडकी बहीण योजना बंद करण्याचा कट'; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

Sharad Aher Accuses Mahayuti Government of Conspiracy to ShutDown Ladki Bahin Yojana Ahilyanagar Congress News : महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी अहिल्यानगरमध्ये मोठा दावा केला.
Ladki Bahin Yojana News
Ladki Bahin Yojana NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Government Schemes News : विधानसभा निवडणुकीचा निकाल अनाकलीन आहे. लोकसभेला महाविकास आघाडीने 48 पैकी 31 जागा जिंकल्या. विधानसभेला नेमकं काय झालं? महायुतीने निवडणुकीत भरमसाठ घोषणा केल्या. त्यात लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली.

आता तिच योजना महायुती कट करून बंद पाडण्याची तयारी करत असून, त्यासाठी न्यायालयात आव्हानं दिलं जात आहे, असा गौप्यस्फोट काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांनी केला.

अहिल्यानगर इथं काँग्रेस (Congress) पक्ष संघटनाची सरकारी विश्रामगृहावर पक्ष संघटनेची बैठक झाली. पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी होते. प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण, उबेद शेख, खलील शेख, संपत म्हस्के, श्याम वाघस्कर आदी उपस्थित होते.

Ladki Bahin Yojana News
Prakash Chitte On Radhakrishna Vikhe : 'मंत्री विखेंचा हिंदुत्वाशी अलीकडच्या काळात संबंध'; प्रकाश चित्तेंनी इतिहासच काढला

शरद आहेर यांनी युवकांना नोकऱ्या नाहीत, शेतीमाला भाव नाही. राज्य सरकार हे सर्व सामान्यांचा भ्रमनिराश करणारे ठरले आहे. अशा परिस्थितीमध्ये जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून (BJP) जातीय धुव्रीकरण केले जात आहे. भारत-पाकिस्तान, असे वातावरण निर्माण केले जात आहे. यापूर्वी ही 2019 मध्ये निवडणुकीच्या वेळेस पुलवामा इथं सैनिकांवर हल्ला झाला. यामध्ये 40 सैनिक शहीद झाले. 300 किलो आरडीएक्स कसे आले? या निवडणुकीचा भावनिक मुद्दा प्रचाराच्या वेळेस केला गेला, याकडे लक्ष वेधलं.

Ladki Bahin Yojana News
Balasaheb Thorat : 'स्थानिक'च्या निवडणुकांना 'MVA' कशी समोरं जाणार; बाळासाहेब थोरात म्हणाले...

काही ‘हुशार’ फायद्यासाठी पक्ष बदलतात

माजी मंत्री थोरात यांनी काँग्रेसचे तत्व राज्य घटनेतील तत्व आहे. सत्ताधाऱ्याकडून राज्यघटनेतील तत्वाला धोका निर्माण केला जात आहे. वर्णव्यवस्था आणण्याचा डाव आहे. समाजातील गोरगरिब, अल्पसंख्याक घटक हा काँग्रेसबरोबरच आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याची गरज आहे. वाईट काळात जे साथ देतात, त्यांची दखल घेतली जाते. वाईट काळ हा कायम नसतो. वाईट काळानंतरच चांगला काळ ही येत असतो. काही ‘हुशार’ हे परिस्थितीनुसार आपल्या फायद्यासाठी पक्ष बदलता. परंतु, देशाला काँग्रेस पक्ष पुढे घेऊन जाऊ शकतो, याकडे लक्ष वेधलं.

अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

राज्यातील दोन पक्ष फुटले, त्यांचे निकाल लगेच लागले जातात. मात्र, आरक्षणाचा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याचा निकाल लवकर लावण्यासाठी सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. अधिकारी मनमानी पद्धतीने कारभार करत आहेत. खरे तर सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाच्या आहेत. या निवडणुकाकडे दुर्लक्ष नको, असेही थोरात यांनी म्हटले.

एकत्र काम केल्यास सत्ता अवघड नाही

दीप चव्हाण यांनी सत्तेपेक्षा पक्ष संघटनेमध्ये मोठी ताकद आहे. सत्तेचा कोणी अमरपट्टा घेऊन आलेले नाही. त्यामुळे जे सत्तेवर आहेत, त्यांनी याची जाणीव ठेवावी. सर्वांनी एकत्र काम केल्यास पुन्हा सत्ता मिळविणे अवघड नाही. सर्वसामान्य जनता ही काँग्रेस पक्षाशी कायम जोडलेली आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com