Ahilyanagar Ward Structure : प्रभाग रचनेतच, काँग्रेस-ठाकरे-पवार पक्षाच्या 'धज्जियाँ' उडवल्या; महापौर पदाबरोबर प्रभागाचं आरक्षण प्रलंबित

Ahilyanagar Municipal Corporation Ward Structure Congress-MVA Faces Setback by BJP Mahayuti : अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग रचना झाली असून, महापौर पदासह प्रभागाचं आरक्षण प्रलंबित आहे.
Ahilyanagar Ward Structure
Ahilyanagar Ward StructureSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar ward restructuring news : काँग्रेस अहिल्यानगरचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांचे वर्चस्व असलेल्या प्रभागाला वेगवेगळ्या चार प्रभागात विभागले गेले. महाविकास आघाडीचे प्राबल्य असलेल्या माजी नगरसेवकांचा प्रभागांना असाच धक्का सत्ताधारी भाजप महायुतीने दिला आहे.

दरम्यान, प्रत्येक निवडणुकीपूर्वी महापौर पदासाठी आरक्षण निश्चित केले जात होते. यंदा मात्र महापौर पदाचं आरक्षण निश्चित केलेलं नाही. याशिवाय प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाबरोबर आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केलेलं नाही. अहिल्यानगर महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहे.

अहिल्यानगर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रत्येकी चार सदस्यांचे 17 प्रभाग असलेली प्रारूप रचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या (Election Commission) मान्यतेनुसार प्रसिद्ध केली आहे. बोल्हेगाव, भिस्तबाग, पाइपलाइन रोडवरील प्रभागांमध्ये किंचित बदल करण्यात आले आहेत.

अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. यामुळे प्रस्थापित नगरसेवकांना धक्का लागला आहे, तर इच्छुक नगरसेवकांना प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारच्या (Government) निर्देशाप्रमाणे ही जनगणनेचे प्रगणक गट न तोडता, प्रभाग रचना करण्यात आलेली असली, तरी प्रभागांची रचना नदी, ओढे, महामार्ग ओलांडून करण्यात आल्याची दिसते.

Ahilyanagar Ward Structure
Amol Khatal And Satyajeet Tambe : खताळ-तांबेंचा हाताला-हात; नेमकं काय घडलं? संगमनेरमधल्या गदारोळावर राजकीय 'तडका'!

प्रभाग रचनेत, कल्याण रोड, तोफखाना, लालटाकी, सर्जेपुरा, मंगलगेट, झेंडीगेट आणि मध्य शहरातील प्रभागात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. सावेडीतील सिव्हिल हडको, प्रोफेसर चौक, कुष्ठधाम रोड, झोपडी कँटीन परिसर, कोठला या भागांचा समावेश असलेल्या प्रभागातही लक्षणीय बदल करण्यात आले आहे. प्रभाग रचनेत चारमध्ये सर्वाधिक, तर 15 मध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे.

Ahilyanagar Ward Structure
Shiv Sena : नाशिकमधील ती झोपडपट्टी वाचवण्यासाठी शिवसेना मैदानात, महापालिका आयुक्तांकडे धाव..

दरम्यान, प्रत्येक निवडणुकीपूर्वी महापौर पदासाठी आरक्षण निश्चित केले जाते. यंदा मात्र महापौरपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले नाही. तसेच प्रभाग रचनेचा कार्यक्रमात आरक्षण निश्चित करण्यात आलेले नाही. मात्र या प्रभाग रचनेतून सत्ताधारी भाजप महायुतीने काँग्रेस मविआला धक्का देण्याबरोबर नव्याने इच्छुकांना देखील धक्का बसला आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार झाली, असून 15 सप्टेंबरपर्यंत हरकती, सूचनांची मुदत देण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने या प्रभाग रचनेवर अभ्यास सुरू केला आहे. आवश्यक त्या ठिकाणी हरकती घेणार असून, सूचना मांडणार आहे. महापालिकेवर शिवसेना ठाकरे सेना पक्षाचा भगवा फडकणारच असा दावा शहरप्रमुख किरण काळे यांनी केला.

काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी ही प्रभाग रचना म्हणजे, आमचे आयुक्त आणि कलेक्टर विरोधक आहेत का? सगळे विरुद्ध टोक जोडण्याचा प्रकार आहे. भौगोलिक निकष समजलेच नाही. तसंच गेल्यावेळी एससीचे नऊ नगरसेवक होते. या प्रभागरचनेत सरळ-सरळ एससीचे नगरसेवक आठवर आणण्याचा घाट घातला आहे. दरवेळी न्यायालयात जाऊन वेळ घालवायचा का? असा प्रश्नही दीप चव्हाण यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com