Amol Khatal And Satyajeet Tambe : खताळ-तांबेंचा हाताला-हात; नेमकं काय घडलं? संगमनेरमधल्या गदारोळावर राजकीय 'तडका'!

Balasaheb Thorat Opponents Amol Khatal & Satyajeet Tambe Unite at Ganpati Aarti in Sangamner : गणपती आरतीनिमित्ताने संगमनेरमध्ये शिवसेना आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबे एकत्र आले होते.
Satyajeet Tambe Vs Amol Khatal
Satyajeet Tambe Vs Amol KhatalSarkarnama
Published on
Updated on

Sangamner politics update : राज्याचं लक्ष वेधून घेणाऱ्या संगमनेरमधील राजकीय घडामोडीला वेगळं वळण लागलं आहे. गणपती आरतीनिमित्ताने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे, नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे आमदारा अमोल खताळ एकत्र आले आहे.

या दोघांनी एकाच दिव्यानं गणपती बाप्पांची आरती केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या दोघांनी एकत्र केलेल्या आरतीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल होत आहे.

संगमनेरमधील विधानसभा निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली. काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरातांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नवखे अमोल खताळ यांनी पराभव केला. यानंतर हा मतदारसंघ चर्चेत आला. गेल्या 10-15 दिवसापूर्वी संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या राजकीय कीर्तनावरून चांगलाच गदारोळ झाला. बाळासाहेब थोरातांवर यानिमित्ताने निशाणा साधले गेले.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी संयमाने या आरोपांना तोंड देत, सत्ताधारी विरोधकांना त्यांची जागा दाखवली. संग्रामबापू भंडारे महाराज यांनी थोरातांवर आगपाखड करताना, नथुरामजी गोडसे होण्याची भाषा वापरली. थोरातांनी देखील तेवढ्यात मुरब्बीपणे प्रत्युत्तर देत विचारांशी तडजोड न करता, असा गोडसे समोर आल्यावर आनंदानं बलिदान स्वीकारील, असं म्हटलं. थोरात यांच्या समर्थनात मोठा मोर्चा काढण्यात आला.

Satyajeet Tambe Vs Amol Khatal
OBC strategy : ओबीसींच्या 'या' नव्या डावामुळे सरकारनं प्लॅनच बदलला; उपसमितीत हातचा राखला?

वारकरी सांप्रदायानं देखील थोरातांच्या भूमिकेचं स्वागत केलं. हे प्रकरण थंड होत नाही तोच, शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर दौऱ्यावर येत, थोरातांवर टीका केली. यानंतर आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याची घटना झाली. या घटनेचा निषेध नोंदवत, मोर्चा काढण्यात आला. या हल्ल्यावरून संगमनेरमध्ये चांगलाच राजकीय गदारोळ झाला. आमदार खताळ यांनी नाव न घेता, थोरातांना निशाणा केलं.

Satyajeet Tambe Vs Amol Khatal
Congress Politics : विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांचं ठरलं; लवकरच होणार नव्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाची घोषणा

संगमनेरमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी दंगल झाली होती. ती राज्यात गाजली. निवडणुकीनंतर तिथं परिवर्तन झालं. ते लक्षवेधी ठरलं. आता राजकीय रणसंग्राम संगमनेरमध्ये सुरू आहे. यात बाळासाहेब थोरात यांचे भाचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे थोरातांचा किल्ला लढवत आहेत. या राजकीय गदारोळात आमदार तांबे संगमनेरमध्ये मैदानात उतरून, थोरातांची उणिव भरून काढत आहेत.

संगमनेरच्या मैदानात थोरातांची राजकीय कमतरता जाणवत असली, तरी थोरात देखील प्रचंड सक्रिय आहे. तेवढ्यात ताकदीने नवखे आमदार अमोल खताळ देखील तयारीत असल्याचं दिसत आहे. या गदारोळात संगमनेरमध्ये वेगळीच राजकीय घडामोड पाहायला मिळाली. संगमनेरमधील एका गणेश मंडळाच्या आरतीनिमित्ताने आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ एकत्र आले होतो.

या दोघांनी एकाच दिव्यानं गणपती बाप्पांची आरती केली. या दोघांनी हा दिवा एकत्र धरला होता. कट्टर विरोधकांनी हात गणपती बाप्पांच्या आरतीनिमित्ताने एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं. गणपती बाप्पा विरोधकांनी देखील एकत्र यायलाच लावतो, अशी चर्चा मंडपात होती. तर संगमनेरसह राज्यातील राजकारण्यांमध्ये या घडामोडीची दखल घेतली गेली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com