Ahilyanagar cow meat incident : दोन मुलांकडून रस्त्यावर गोवंशीय मांस फेकणारा पोलिसांकडून गजाआड; आयुक्तांसह निम्मी मनपा 'फिल्ड'वर!

Ahilyanagar Cow Meat Incident Hindutva Protest & Police Arrest in Zendigate : अहिल्यानगर शहरातील रस्त्यावर गोवंश मांस रस्त्यावर फेकणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांन अटक केली आहे.
Ahilyanagar cow meat incident
Ahilyanagar cow meat incidentSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar police arrest Zendigate : अहिल्यानगर शहरातील कोठला बसस्थानक परिसरातील महामार्गावर गोवंश मांस फेकण्याच्या प्रकार काल उघडकीस आला. यानंतर हिंदुत्वावादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेत, 'रास्ता रोको' आंदोलन केले. अहिल्यानगर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाईच्या मागणीसाठी रस्त्यावर झोपून घेतलं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेनं रस्त्यावर गोवंश मांस फेकणाऱ्याला अटक केली असून, त्याच्याकडून याप्रकरणात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी अहिल्यानगर शहरातील बेकायदेशीर कत्तलखान्यांवर कारवाई मागणी करताना, गोवंशाची बेकायदेशीर कत्तल करणाऱ्यावर कारवाईची मागणी लावून धरली. आमदार जगतापांनी अहिल्यानगर शहरात गोवंश बेकायदेशीर कत्तलीचा निषेधासाठी 25 सप्टेंबरला महामोर्चाची घोषणा केली. आंदोलनस्थळी भेट देणारे महापालिका आयुक्त यशवंत डांगेंना देखील 'हाजी अब्दुल' डांगे, असे म्हणत इशारा दिला.

रस्त्यावर गोवंश मांस फेकणाऱ्याविरोधात कडक कारवाईची मागणी हिंदुत्ववादी (Hindutva) संघटनांनी केली होती. यासाठी आंदोलनात डुक्कर देखील आणण्यात आले होते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गोवंश मांस फेकणाऱ्याला अवघ्या सहा तासांत अटक केली.

Ahilyanagar cow meat incident
Kabutarkhana Issue Mumbai : मुंबईत मराठीविरुद्ध जैन वाद उफाळण्याची चिन्हं; भाजप मंत्र्यांच्या कुबतरखान्यांना, 'आम्ही गिरगावकर' चिकन-मटण सेंटरने उत्तर देणार

तरबेज आबीद कुरेशी (वय 24, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली. तरबेज याने दोन गोवंशीची कत्तल केली. त्याची मांस विक्री केली. यानंतर कत्तलीतील वेस्ट मासं व अवशेष फेकून देण्यासाठी दोन विधिसंघर्षीत बालकांना मोपेड गाडी दिली. यासाठी त्यांना पैसे दिले.

Ahilyanagar cow meat incident
Kunbi Caste Certificate Distribution : फडणवीस सरकारने पाळली जरांगेंची डेडलाईन; मुक्तिसंग्रामदिनी मराठवाड्याला कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप

या दोघा बालकांनी हे गोवंशीय मांस आणि त्याचे अवशेष कोठला बसस्थानक परिसरातील रस्त्यालगत फेकून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले. तरबेज कुरेशी याने गुन्ह्यात वापरलेली 40 हजार रुपयांची विना नंबरची जुनी दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह निम्मी महापालिका अहिल्यानगर शहरात बेकायदेशीर कत्तलखान्यांविरोधात कारवाईसाठी मैदानात उतरले आहे. अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट आणि मुकुंदनगर भागात आज सकाळपासून आयुक्त डांगे यांच्यासह महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने तपासणी केली. महापालिका प्रशासनाच्या या तपासणीत बेकायदेशीर कत्तलखाने आढळले नसले, तरी प्रशानसाकडून सर्चिंग सुरूच राहील. बेकायदेशीर कत्तलखान्यांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com