Ahilyanagar District Bank Election : नीलेश लंकेंचा जिल्हा बँकेत शड्डू! विखे पाटील गटाची प्रतिष्ठा पणाला; थोरात काय करणार?

Ahilyanagar District Bank Election: Nilesh Lanke faces Rahul Shinde in Parner as Vikhe Patil and Balasaheb Thorat shape key political equations : पारनेरमधील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष; राम शिंदे यांची रणनीती आणि सुजित झावरे पाटील, गीतांजली शेळके यांच्या भूमिकेने विजयाचे गणित बदलण्याची शक्यता.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar Bank Election 2026 : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न वरवरचे, होत की, खरचं होते, असा प्रश्न आता चर्चेत आला आहे. पारनेर तालुक्यातील सेवा संस्था मतदारसंघातील जागा बिनविरोध करण्यात श्रेष्ठींना अपयश आले आहे. याच मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके या निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे पालकमंत्री डाॅ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा कट्टर समर्थक राहुल शिंदे लढत देत आहेत. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाचा विखे पाटील पिता-पुत्र जिल्हा बँकेत वचपा घेणार का? विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेसमध्ये एकत्र असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे खासदार लंकेंबाबत काय भूमिका घेणार? खासदार लंके लोकसभेसारखा चमत्कार घडवणार का? राम शिंदे ऐनवेळी कोणता डाव टाकणार? अशा अनेक प्रश्न चर्चेत आहेत.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीत 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यात विशेष करून, भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांची जागा बिनविरोध झाली आहे. तसेच त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयाने एकनाथ घोगरे यांची याचिका देखील फेटाळली आहे. विखे पाटील-थोरात यांच्या सहमती एक्सप्रेसमध्ये सात जागा थोरात यांच्या बिनविरोध झाल्या आहेत, तर तीन जागा विखे पाटील यांच्या बिनविरोध झाल्या आहेत. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्याची एक जागा बिनविरोध झाली आहे.

खासदार लंके (Nilesh Lanke) यांना जिल्हा सहकारी बँकेत एंट्रीसाठी संघर्ष करावा लागत आहे. बिनविरोधच्या चर्चेत, ते आणि राम शिंदे हे पहिल्यापासून नव्हते. राम शिंदे यांनी थेट मंत्री विखे पाटील यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताच, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रंगत भरली. त्या खोलाखोताल खासदार लंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन, जिल्हा बँकेबाबत चमत्कार घडवणार असल्याचे सूचक संकेत दिला. यानंतर त्यांनी राम शिंदे यांची भेट घेऊन, बंद दाराआड चर्चा केली. यानंतर पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून, विखे पाटील-थोरात यांनी अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृहावर बिनविरोधसाठी जिल्ह्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना गळ घातली.

Nilesh Lanke
Manoj Jarange Patil : ‘शिंदे साहेबांसाठी जीवाचे रान केले, हीच चूक?’; मनोज जरांगेंचा ऑडिओ क्लिपवरून घणाघात

दुसऱ्या दिवशी जिल्हा बँक बिनविरोध होईल, असे चित्र निर्माण होत असतानाच, राम शिंदे यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले. यात सर्वाधिक लक्ष लागले होते ते, खासदार नीलेश लंके यांच्या भूमिकेकडे! कारण ते पहिल्यापासून बिनविरोधच्या चर्चेत नव्हते. त्यांनी दहा जागांवर उमेदवार जाहीर करत, बँकेसाठी शड्डू ठोकला आहे. सर्वाधिक लक्षवेधी लढत आहे ती म्हणजे, ते स्वतः पारनेर मतदारसंघातून जिल्हा बँकेसाठी लढत आहे. त्यांच्याविरोधात मंत्री विखे पाटील यांचे कट्टर समर्थक राहुल शिंदे मैदानात आहेत.

Nilesh Lanke
Nagpur Graduate Election 2026 : नागपूर पदवीधरमध्ये मतदानाचा टक्का वाढला; भाजप कमबॅक करणार की काँग्रेस गड राखणार?

लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांनी विखे पाटील पिता-पुत्रांना शह अन् मात दिली होती. त्या पराभवाचा वचपा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील पारनेरमध्ये कोणता राजकीय डाव खेळतात, सहमती एक्सप्रेसमध्ये विखे पाटील यांच्याबरोबर असलेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात काय भूमिका घेतात? याकडे आता लक्ष लागले आहे. ही लढत लंकेविरुद्ध शिंदे नसून, लंकेविरुद्ध विखे पाटील अशी असेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

झावरे अन् शेळके किंगमेकरच्या भूमिकेत

खासदार लंके या लढतीत एकटे दिसत आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी राहुल शिंदे यांच्या मागे मंत्री विखे पाटील यांच्याबरोबरच अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार काशिनाथ दाते, माजी संचालक प्रशांत गायकवाड आणि इतरही कार्यकर्ते आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील व माजी संचालिका गीतांजली शेळके किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. यांच्याकडे मतदारांची संख्या पाहता ती निर्णायक ठरणार आहे. या दोघांच्या भूमिकेवर विजयाचे गणित असणार आहे.

शेळकेंची घेतलेली सुनेत्रा पवारांची भेट चर्चेत!

सुजित झावरे पाटील यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. महायुतीत असलेली शिवसेना निर्णायक भूमिकेत आहे. गीतांजली शेळके यांचा पवार कुटुंबाची असलेली जवळीक सर्वश्रुत आहे. जिल्हा निवडणुकीपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट चर्चेत होती. गीतांजली शेळके निवडणुकीसाठी इच्छुक होत्या. त्यांनी तसा अर्ज देखील दाखल केला होता. परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी अर्ज मागे घेतला. त्या नेमक्या कोणत्या भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा तालुक्यातील राजकारण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com