

Ahilyanagar District Cooperative Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेत अजित पवार राष्ट्रवादीचे अकोलेतील आमदार डाॅ. किरण लहामटे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या समर्थक संजीवनी शिंदे यांचा विजय झाला आहे.
संजीवनी शिंदे यांना 49, तर आमदार लहामटे यांना 36 मते मिळाली आहे. सोसायटी मतदारसंघात ही लढत होती. संजीवनी शिंदे यांच्या विजयाबरोबरच राम शिंदे यांचा जिल्हा बँकेत संख्याबळ दोनने वाढले आहे. यापूर्वी जिल्हा बँकेत राम शिंदे यांचे समर्थक सचिन घुमरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संजवनी शिंदे यांच्या जिल्हा बँकेचे (DCC Bank) माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांची कन्या आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि सीताराम गायकर यांची गळाभेट झाली होती. त्यावरून निकालाची चर्चा रंगली होती. काहींनी या भेटीतच निकाल स्पष्ट झाला, असे संकेत दिले होते.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीला समोरे जाताना भाजपचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी सीताराम गायकर यांची भेट देखील घेतली होती. संजीवनी शिंदे यांचा निकाल येताच, ही भेट देखील चर्चेत आली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील-काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांची सहमती एक्स्प्रेस रूळावर धावू लागल्याने, गायकर त्यात मागे पडले होते. परंतु राम शिंदेंनी ऐनवेळी भेट घेत, त्यांना बळ दिल्याने, हा निकाल फिरल्याची चर्चा आहे.
सलग दहा वर्षे संचालक पदी राहिल्याने सिताराम गायकर यांना निवडणूक लढवण्यावर बंधन आले आहे. त्यांनी कनेच्या माध्यमातून उमेदवारी दाखल केली होती. संजीवनी यांनी विजयश्री खेचून आणला. तशी आमदार लहामटे आणि संजीवनी शिंदे यांच्यातील लढत चुरशीची झाली. दोघांना मिळालेली मते पहिल्यास, संजीवनी यांचा 13 मतांनी विजय झाला आहे.
आमदार लहामटे या निवडणुकीत एकटे पडले होते. त्यांनी प्रस्थापितांना आव्हान दिले होते. त्यातूनच त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. प्रस्थापितांना आव्हान उबभे केल्याने निवडणूक चुरशी होणार, हे निश्चित झाले होते. भाजपचे माजी आमदार वैभव पिचड, आणि संजीवनी यांचे वडील बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांची भूमिका निर्णायक ठरली. याला बळ मिळाले राम शिंदे यांचे!
आमदार लहामटे यांच्याकडे सुरवातीला विजयाचे पारडे झुकलेले दिसत होते. पुढे मतदानाच्या दिवशी मात्र मतदान केंद्रावरील पिचड-गायकर यांच्या गळाभेटीने निवडणुकीचे चित्रच पालटले. विजयाचे पारडे संजीवनी शिंदेंच्या बाजूने झुकल्याचे दिसू लागले. त्यामुळे निवडणूक चुरशी झाली. पण विजयाचे पारडे संजीवनी यांच्या बाजूने झुकले. संजीवनी यांच्या विजयाबरोबरच आमदार डाॅ. लहामटे यांना हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. आगामी काळात राजकीय आव्हाने त्यांच्यासमोर उभे असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.