

Ahilyanagar news : हिंदुत्ववादी कार्यकर्ता तथा महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी या कामगारावर मुस्लिम बुहल भाग मुकुंदनगर परिसरातील दर्गादायरा परिसरात शुक्रवारी झालेल्या जीवघेण्यात हल्ल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.
धीरजसिंह राजपूत उर्फ परदेशी याच्या मृत्यूमुळे हिंदुत्वादी संघटनांनी शहर बंदची हाक दिली असून, अहिल्यानगर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, धीरजसिंह याच्या पत्नीने जिथे हल्ला झाला, तिथेच अंत्यसंस्कार करणार, अशी भूमिका घेतल्याने तणावाच्या वातावरणात अधिकच भर पडली आहे. दरम्यान, या घटनेवरून अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आक्रमक झाले आहेत.
धीरजसिंह हा शुक्रवारी सायंकाळी दर्गादायरा परिसरात विद्युत पोलाचे काम करायला गेला होता. यावेळी त्याच्यावर दहा ते पंधरा जणांनी जीवघेणा हल्ला केला. दोन दिवसांपासून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यात त्याचा मृत्यू झाला. यानंतर आज हिंदुत्ववादी (Hindu) संघटनांनी घटनेच्या निषेधार्थ शहर बंदची हाक दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हल्ल्यातील चौघांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्यातील चौघे मुख्य आरोपी युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद या चौघांना अटक केली आहे. धीरजसिंहवर करण्यात आलेल्या हल्ल्यामागे काय कारण होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मयत धीरजसिंह याच्या पत्नीने, माझ्या पतीला मुकुंदनगरमध्ये काम करण्यासाठी विशिष्ट समाजाच्या व्यक्तीने धोक्याने नेले. तिथे त्याला कब्रस्तानमध्ये नेऊन मारण्यात आले आहे. जिथे त्यांना मारले, तिथेच अंत्यसंस्कार करणार, नाहीतर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
या घटनेवर आमदार संग्राम जगताप गेल्या दोन दिवसांपासून आक्रमक आहेत. धीरजसिंह याच्या घरच्यांनी भेट घेत सांत्वन केले आहे. पोलिस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांची भेट घेतली आहे. या हल्ल्यामागे पूर्वनियोजित कट आणि संशयास्पद निधीपुरवठा असा खळबळजनक दावा संग्राम जगताप यांनी केला.
या घटनेत पॅलेस्टीन समर्थक, स्थानिक ताकदवान हस्तक आणि पोलिस कर्मचाऱ्यांचाही सहभाग असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. केवळ प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्यांनाच नव्हे, तर यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर मकोका अंतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागमी आमदार जगताप यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
या घटनेचा मनपा कामगार संघटनेने निषेध केला असून, मुकुंदनगर परिसरावर बहिष्कार टाकला आहे. मनपाचे कोणतेही कर्मचारी मुकुंदनगर भागात स्वच्छता वा पाणीपुरवठा करण्यासाठी जाणार नाहीत, असे कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल व सरचिटणीस आनंद वायकर यांनी जाहीर केले.
मनपा कामगार संघटनेच्या या भूमिकेवर मुकुंदनगरमधील स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. मनपा कामगार संघटना चुकीची भूमिका घेत असून, काही अपप्रवृत्तींमुळे संपूर्ण मुकुंदनगरला वेठीस धरता येणार नाही. कायदेशीर कारवाई होईल आणि ती होणारच आहे. ही घटना मोठी आहे. मनपा कामगार संघटनेने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आम्ही देखील आयुक्त कार्यालयात बसून घेऊ अशी मागणी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.