Sangamner District Demand : शिंदेंच्या शिलेदाराचा बॉम्ब! ‘संगमनेर जिल्हा करा’; मग शिर्डी-श्रीरामपूरचं काय? जिल्हा विभाजनावर नवा वाद!

Shiv Sena MLA Amol Khatal: अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात करून तसा प्रस्ताव विशेष समितीसमोर ठेवावा, अशी मागणी केली.
Shiv Sena MLA Amol Khatal
Shiv Sena MLA Amol KhatalSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar District Division : अहमदनगरचं अहिल्यानगर नामांतर झालं. त्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन होईल, असं सांगितलं जायचं. यातच शिर्डी, श्रीरामपूर जिल्हा व्हावी, तशी त्यांची जुनी मागणी आहे.

याशिवाय संगमनेरची देखील जिल्हा व्हावा, अशी मागणी आहे. आता हाच मुद्दा एकनाथ शिंदे शिवसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात तापवला आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अमोल खताळ यांनी, अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर (Sangamner) जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तातडीने विशेष समितीसमोर ठेवून त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्हा निर्माण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. या मागणीसाठी विविध वेळा आंदोलनही देखील करण्यात आली. सन 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतरही जिल्हा विभाजनाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.

Shiv Sena MLA Amol Khatal
Sagar Moholkar : मोहोळकराच्या शरीरात अजूनही चार बुलेट्स; गोळीबारानंतरचे 10 दिवस, पैलवानच्या प्रकृतीबाबत धक्कादायक अपडेट

राज्य सरकारने संगमनेर जिल्हा निर्मितीसंदर्भातील प्रस्ताव तातडीने विशेष समितीसमोर ठेवून त्यावर सकारात्मक निर्णय घ्यावा. याशिवाय संगमनेर तालुक्यातील 16 तलाठी कार्यालये आणि 3 मंडल अधिकारी कार्यालयांच्या इमारतींसाठी, तसेच भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारतीवर अतिरिक्त मजला बांधण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, अशीही मागणी आमदार खताळ यांनी केली.

Shiv Sena MLA Amol Khatal
Bribery Case : एक कोटी 20 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात कोर्टाने घेतला मोठा निर्णय, सहआयुक्तांचा मुक्काम तुरुंगातच! 'हे' ठरले निमित्त!

नामांतरानंतर विभाजनाचा मुद्दा मागे पडला

आमदार खताळ यांनी संगमनेर जिल्हा निर्मितीची मागणी करून, पुन्हा एकदा अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा तापवला आहे. अहमदनगरचे नामांतरावेळी जिल्हा विभाजन केलं जाईल, असे सांगितलं जात होतं. प्रा. राम शिंदे सभापती होण्यापूर्वी जिल्हा विभाजनावर भाष्य करायचे. पालकमंत्री असताना, जिल्हा विभाजनसाठी 800 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिल्याचेही सांगायचे.

राजकीय वातावरण तापणार

पण आता हा मुद्दा नामांतरानंतर मागे पडला. आता जिल्हा विभाजनाचं कोणी नाव देखील घेत नाही. पण हा मुद्दा आमदार खताळ यांनी पुन्हा विधिमंडळात उपस्थित केल्याने, अन् तो थेट विशेष समितीसमोर नेण्याची मागणी केल्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार असे दिसतं आहे.

शिंदेंच बळ मिळणार का?

आमदार खताळ यांच्या या मागणीवर, राज्य सरकार किती सकारात्मक भूमिका घेते, अन् त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती सकारात्मक प्रतिसाद देऊन, आमदार खताळ यांच्या पाठपुराव्याला किती बळ देतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

झेडपी निवडणुकीत मुद्दा तापणार?

पण आमदार खताळ यांच्या या मागणीनंतर शिर्डी, श्रीरामपूर इथले पुढारी देखील जिल्हा विभाजन करून, आपापला तालुका जिल्हा करण्याची मागणी करण्याची शक्यता वर्तवली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा तापेल असे दिसतं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com