
Ahilyanagar city disputes : अहिल्यानगर शहराच्या गांधी मैदानातील धार्मिक स्थळावर जेसीबी फिरल्यावरून मुस्लिम समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला. आता हिंदू सकल समाजाने जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाला निवेदन देत रस्त्याच्या मध्यभागी येणारी धार्मिक स्थळ हटवण्याची मागणी केली.
यासाठी निवेदन देत, कारवाई न झाल्यास आठ दिवसांत रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हिंदू-मुस्लिम वाद उफळवला जात असल्याने शहरातील वातावरण दूषित होऊ लागलं आहे. जिल्हा आणि महापालिका प्रशासनाने देण्यात आलेल्या निवेदन देण्यासाठी बहुतांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे कार्यकर्ते होते.
अहिल्यानगर शहराच्या गांधी मैदानातील एका धार्मिक स्थळावर रविवारी पहाटं जेसीबी फिरवण्यात आला. यानंतर अहिल्यानगर शहारातील मुस्लिम (Muslim) समाज आक्रमक झाला. पोलिस अधीक्षक कार्यालयावर विराट मोर्चानं जात, धार्मिक स्थळाची विटंबना करणारे आणि त्यामागील सूत्रधारावर कारवाईची मागणी केली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या तोंडावर अहिल्यानगर शहरात कोणताही अनुचित प्रकार नको म्हणून, पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली.
दरम्यान, आज हिंदू (Hindu) सकल समाजाच्या नावाने जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासनाला निवेदन देत, अहिल्यानगर शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेली धार्मिक स्थळे हटवण्यात यावी, अशी मागणी केली. आठ दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास मोर्चा काढला जाईल, असा इशारा देण्यात आला.
न्यायालयाने शहर आणि महामार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणारे प्रार्थना स्थळे हटविण्याबाबतचा आदेश अनेकदा दिले आहेत. परंतु प्रशासनाकडून कारवाईस जाणिवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. यातून शहरात सातत्याने वातावरण तणावपूर्ण होते. अहिल्यानगर शहरात रस्ता रुंदीकरण होऊन, काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. या रस्त्यांवरील हिंदूंची धार्मिक स्थळे होती, स्वतःहून मागे घेतल्याकडे लक्ष वेधले आहे.
परंतु अनाधिकृत थडगे मात्र जागेवरच राहिली. इथं वीज वाहिनीवर आकडे टाकून, वीज बेकायदेशीर वापरली जाते. तसेच या थडग्यांच्या सेवेच्या नावाखाली त्यांच्या आजूबाजूला अनाधिकृत जागा वापरली जाते. हा सर्व प्रकार लँड जिहादच आहे. प्रशासनाने याची योग्य वेळी घेत लँड जिहाद रोखून शहरातील कायदा-सुव्यवस्था राखणे गरजेचे असल्याची अपेक्षा निवेदनात व्यक्त केली.
कायदा सर्वांना समान आहे. बेकायदेशीर थडगे हटवणे गरजेचे असताना, पोलिस अशाचे रक्षण करताना दिसते.आपल्या धर्मनिरपेक्ष देशात हे अशोभनीय आहे. आगामी काळात मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे सण साजरी होणार आहेत. यानिमित्ताने शहरातील वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न जिहादी प्रवृत्तीकडून होण्याची शक्यता आहे. परंतु कुठल्याही प्रकाराची थडगे हा मुस्लिम धर्माचा भागच नाही. पण एक लँड जिहादचा प्रकार आहे. प्रशासनाने न्यायालयाचे आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून शहरातील वाहतुकीस अडथळे ठरणारी अनाधिकृत थडगे तात्काळ हटवावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हा प्रशासन आणि महापालिका निवेदना देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. सुरेश बनसोडे म्हणाले, "अहिल्यानगरमध्ये घटना घडली की, अनधिकृत थडगं पाडण्यात आलं. ती पाडण्याची वेळ का आली. शहरातील रस्त्यांची कामे चालू आहे. यात सिद्धार्थनगर आणि जिल्हा रुग्णालयासमोरील हिंदूंची धर्मस्थळ मूळ जागेवर हटवून मागे घेण्यात आली. या गोष्टी फक्त हिंदूंची स्वीकारायच्या का? हिंदूंनी मान्य करायचं, परंतु मुस्लिमांनी एखादा दगड आणून त्यावर हिरवं कापड टाकून अतिक्रमण करायचं." हिंदूंनी ऐकायचं, अन् मुस्लिमांनी आडमुठेपणाची भूमिका घ्यायची. हिंदू समाजाच्यावतीनं आम्ही आता जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आहे. आठ दिवसांत, वाहतुकीला अडथळे ठरणारी थडगे काढली नाही तर, तसे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत, आठ दिवसांत कारवाई न झाल्यास मोठा मोर्चा काढू, असा इशारा सुरेश बनसोडे यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.