Ahilyanagar Karjat : नगराध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर घाई? प्रशासनानं सुनावणीची तारीख घेतली अलीकडं

District Collector no confidence motion Ahilyanagar Nagaradhyaksha Usha Raut Karjat municipal politics : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात दाखल अविश्वास ठरावावर नवीन कायद्यानुसार सोमवारी सुनावणी होणार आहे.
Usha Raut
Usha RautSarkarnama
Published on
Updated on

Karjat political news : राज्य मंत्रिमंडळाने नगराध्यक्षांना हटविण्याचे अधिकार नगरसेवकांना असल्याचा निर्णय दिला आहे. राज्यातील महायुती सरकारचा हा अध्यादेश भाजप आमदार तथा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पहिल्यांदा पथ्यावर पडेल, असे संकेत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या गटाचे कर्जत नगरपंचायतीमधील सत्ताधारी नगरसेवकांनी बुधवारी नगराध्यक्षांविरोधात पुन्हा एकदा सुधारित अविश्वास ठराव दाखल केला. यावर आता सोमवारी (ता. 21) सुनावणी होणार आहे. जिल्हा प्रशासनानं सुरुवातीला मंगळवारी (ता. 22) सुनावणीची तारीख काढली होती. परंतु आता नवीन अध्यादेशानुसार जिल्हा प्रशासनानं नवीन तारीख दिल्यानं ती अलीकडं घेण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या या नवीन अध्यादेशानुसार नगराध्यक्षांच्या विरोधात दाखल झाल्यानंतर त्यावर 10 दिवसांत सभा बोलवून मतदान (Vote) घेण्याचे बंधनही जिल्हाधिकाऱ्यांवर घालण्यात आलं आहे. त्यानुसार कर्जत नगरपंचायतीमधील नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात दाखल अविश्वास ठरावावर सोमवारीच (ता. 21) निर्णय होण्याची शक्यता असून, खांदेपालट निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे.

Usha Raut
Maharashtra Cabinet Meeting : फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; 65 वर्षांनंतर पहिल्यांदाच 1500 लोकसंख्येच्या 'या' गावात होणार कॅबिनेट बैठक

कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस (Congress), असे मिळून 17 पैकी 12 नगरसेवकांना घेऊन आमदार रोहित पवार यांची एकहाती सत्ता होती. भाजपचे दोन नगरसेवक आहेत. आमदार रोहित पवार गटाच्या राष्ट्रवादीमधील आठ, काँग्रेसचे तीन आणि भाजपचे दोन, असे एकूण 13 जणांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

Usha Raut
kolhapur municipal corporation : महापालिकेला डबऱ्यात कोण घालतयं? 62 कोटी वसूल होणार कसे?

अविश्वास ठरावावर कारवाई करायची म्हटली, तर पूर्वीच्या 2020 च्या कायद्यानुसार प्रक्रियेला तीन महिने लागायचे. नवीन कायद्यानुसार नगराध्यक्षांना हटविण्याचे अधिकार नगरसेवकांना दिले आहेत. यानुसार उषा राऊत यांना नगराध्यक्ष पदावरून हटवण्याचा कालावधी आता खूपच कमी होणार आहे. यामागे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा मोठा सहभाग असल्याचे मानले जाते.

कर्जत नगरपंचायतमध्ये आमदार रोहित पवार यांच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावण्यामागे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा मोठा सहभाग आहे. सत्तेतून फुटलेल्या नगरसेवकांची मोट बांधण्यापासून त्यांना एकसंघ ठेवण्याची कसरत आहे. नगरसेवकच नगराध्यक्षांना पदावरून दूर करू शकतात, मंत्रिमंडळाच्या अध्यादेशाच्या निर्णयानुसार वेळकाढूपणा प्रक्रियेस लगाम लावल्याची आता रंगली आहे.

रोहिणी घुले नगराध्यक्षा पदावर वर्णी लागणार?

उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे स्थानिक नेते प्रवीण घुले यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांच्या भावजयी रोहिणी घुले या कर्जत नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदावर काम करीत होते. कर्जतचे नगराध्यक्ष पद सर्वसामान्य महिला गटाकडे असल्याने नव्याने पदाधिकारी निवडीत रोहिणी घुले यांचे नाव आघाडीवर दिसते. तर उपनगराध्यक्ष पदासाठी मात्र सर्वच इच्छुकांमध्ये रस्सीखेच दिसते. याबाबत सहलीवर असलेल्या नगरसेवकांशी संपर्क साधला असता सध्या नगराध्यक्षाना पदावरून दूर करणे हेच ध्येय असून पदाधिकारी निवडीवर त्यानंतर एकमत होत, सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

ठरावावर 21 तारखेलाच सुनावणी

कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांची जिल्हाधिकारी आशिया यांनी कर्जत नगरपंचायतीच्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्याकामी पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केलं आहे. यावर आता सोमवारी (ता. 21) या अविश्वास ठरावासंबंधी निर्णयासाठी कर्जत नगरपंचायतीच्या सभागृहात सकाळी 11 वाजता सर्व नगरसेवकांची विशेष सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 22 एप्रिलची होणारी सुनावणी देखील रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com