Maharashtra Cabinet Meeting : फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; 65 वर्षांनंतर पहिल्यांदाच 1500 लोकसंख्येच्या 'या' गावात होणार कॅबिनेट बैठक

Mahayuti government major cabinet meeting Jamkhed Chondi Ahilyanagar Maharashtra state-level political : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक जामखेडमधील चोंडी इथं होणार असून, अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून त्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
Maharashtra Cabinet Meeting
Maharashtra Cabinet MeetingSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar District Administration : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी (ता. जामखेड) इथं लवकरच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून त्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

ही बैठक 29 एप्रिल होणार असल्याची चर्चा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर चोंडी इथं अशी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असल्याचे त्याची राज्य पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या काळात 17 सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 सप्टेंबर 2023मध्ये मंत्रिमंडळ बैठक झाली होती. त्यानंतर आता अशीच बैठक चोंडी इथं होणार आहे. यावेळी मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत.

Maharashtra Cabinet Meeting
Maharashtra Kesari 2025 : अजितदादांच्या समोर झालेला 'तो' निर्णय चुकीचाच...

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 वर्षांनंतर, अशी खेडेगावात पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या महायुती सरकारकडून, अशी बैठक होत आहे. ही ऐतिहासिक बैठक ठरणार आहे. अहिल्यादेवी होळकर यांची 300वी पुण्यतिथी साजरी होत आहे. त्यांच्याच जन्मगावी राज्यमंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने, या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra Cabinet Meeting
Sanjay Shirsat : 'होय, आमचा पक्ष अमित शाहचं चालवतात!', शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट कबूलीच दिली

राज्य मंत्रिमंडळाची अशी खेड्यात बैठक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानुसार चोंडी या गावाची 2011च्या जनगणनेनुसार 1821 लोकसंख्या आहे. अशा खेडे गावात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत असल्याने त्याला महत्त्व आले आहे. या बैठकीसाठी मुंबईत, नागपूरमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या जशा बैठका होतात, तशा तयारी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाला करण्याची तयारी सुरू केली आहे.

महायुती सरकारमध्ये 36 मंत्री आणि सहा राज्यमंत्री या बैठकीला चोंडीत संभाव्य 29 एप्रिलला दाखल होणार आहेत. राज्याचे संपूर्ण मंत्रिमंडळाच चोंडी या खेडे गावी येणार असल्याने स्थानिकांनी या बैठकीची उत्सुकता लागली आहे. प्रशासन नेमकं काय तयारी करणार याची उत्सुकता देखील आहे. या बैठकीत मराठवाड्यासह महाराष्ट्रा संदर्भात काय निर्णय होतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com