

Ahilyanagar MIDC gas shortage : अहिल्यानगर जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रला गॅस टंचाईचा मोठा फटका बसू लागला आहे. याचा थेट परिणाम कंपन्यांच्या उत्पादनावर होऊ लागला आहे. कामकाजाचा आठवडा 5 दिवसांचा करण्याचे कंपन्यांच्या विचारधीन आहे.
कंपन्यांपुढील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, गॅस टंचाई दूर करण्यासाठी एमआयडीसीमधील आमी संघटनेच्या सदस्यांनी भाजप (BJP) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बैठक घेतली. उद्योजकांच्या कंपन्या जाऊन घेतल्यानंतर, मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचे सांगून, हा मुद्दा अधिवेशनात उचलणार असल्याचे आश्वासन दिले.
अमेरिका-इस्त्राइलविरुद्ध इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ, संपूर्ण आखाती देशाला बसली आहे. या युद्धाचा जगाच्या उद्योगावर परिणाम जाणवू लागला आहे. तसेच देशभर औद्योगिक, व्यावसायिक गॅसची टंचाई झळ बसू लागली आहे. याचाच परिणाम म्हणून अहिल्यानगरच्या औद्योगिक क्षेत्रालाही गॅस टंचाईची झळ बसली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्याशी झालेल्या बैठकीत, जिल्हाधिकारी पंकज आशिया, महापौर ज्योती गाडे, आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उद्योजक अनंत देसाई, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे, बीपीसीएलचे अधिकारी मनोज जाधव, एचपीसीएलचे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील यांनी उद्योजकांच्या समस्या समजून घेत, त्यावर संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. 'युद्धामुळे एलपीजी गॅसची निर्माण झालेली टंचाई दूर होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन देशात मुबलक प्रमाणात गॅस उपलब्ध करून दिला आहे. घरगुती गॅसची कमतरता कमी झाली आहे. पण औद्योगिक क्षेत्राला अद्याप मोठ्याप्रमाणात गॅस टंचाईला तोंड द्यावे लागत आहेत. अमी संघटना व उद्योजकांचे प्रश्न समजून घेतलेत. त्यासाठी एमआयडीसीमधील कारखान्यांना सुरळीतपणे गॅस पुरवठ्यासाठी पाइपलाईनची कामे त्वारीत पूर्ण करा,' अशा सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
'कामकाजाचा आठवडा 5 दिवसांचा करण्याचे कंपन्यांच्या विचारधीन आहे. त्यावर संघटनेने निर्णय घेतल्यास बराच फरक पडेल. अहिल्यानगरच्या औद्योगिक क्षेत्राच्या गॅस टंचाईचा मुद्दा उद्या अधिवेशनात मांडून मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार आहे,' असे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिला.
'एमआयडीसीमधील कंपन्यांना पाइपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे. नवीन कनेक्शन त्वरित उपलब्ध करून द्यावे. कंपन्या बंद झाल्याने जर कामगार निघून गेले तर, मोठे नुकसान होईल. कोविड काळात जसे वेगवेगळे पर्याय पुढे आले, त्याचप्रमाणे याही संकटकाळात वेगवेगळे पर्याय अमलात आणावेत. एमआयडीसीमधील गुंडगिरी, दहशत कमी करण्यास प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी. तसेच कंपन्या बाहेरील अतिक्रमणे त्वरित काढावीत,' अशा सूचनाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिल्या.
'अधिकाऱ्यांनी औद्योगिक क्षेत्रात फिरून गॅस पुरवठ्याबाबत पाहणी करावी. अहिल्यानगर शहरात पाइपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्यासाठी 40 हजार कनेक्शन पूर्ण झाली आहेत. मात्र महापालिकेने पाइपलाईन टाकण्याचे दर वाढवल्याने उर्वरित काम प्रलंबित आहे. त्यामुळे स्थायी समितीने दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा,' अशी सूचना मंत्री विखे पाटील यांनी स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांना केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.