
Ahilyanagar news : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्या होम ग्राऊंडवर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटलांनी चांगलच घेरलं आहे.
पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत खासदार लंकेंच्या सहकार पॅनलला माजी खासदार विखे पाटील यांच्या जनसेवा पॅनलने धोबीपछाड दिली आहे. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलने एकी दाखवत पारनेर तालुका दूध संघात 15 पैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे.
पारनेर तालुका दूध (Milk) संघाच्या निवडणुकीत विखे पाटील यांनी थेट सूत्र हाती घेतली. कार्यकर्त्यांची संघटीत मोहीम राबवली. खासदार नीलेश लंके यांच्या 'सहकार' पॅनलशी थेट मुकाबला करताना विखे पाटील यांना विद्यमान आमदार काशिनाथ दाते आणि भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांना बरोबर घेतलं. परिणामी चुरशीच्या लढतीत विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलने पारनेर दूध संघात आघाडी घेतली.
पारनेर तालुका दूध संघ मागील 10 वर्षे बंद होता. चार वर्षांपूर्वी पुन्हा सुरू झाल्यानंतर सध्या दररोज 6,000 लिटर दूध संकलन सुरू आहे, तर पूर्वी हे प्रमाण 70,000 लिटर होते. विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी संघाचा कारभार पुन्हा शेतकरी व संचालकांच्या हाती देऊन, त्याला गतवैभव परत मिळवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
या विजयामुळे सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील सहकारी क्षेत्रात आपला प्रभाव अधिक दृढ केला आहे. दूध संघाचा कारभार त्यांच्या जनसेवा पॅनेलकडे गेल्याने पुढील काही वर्षे तालुक्याच्या सहकार व राजकारणात विखे पाटलांचा दबदबा राहण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतरचा राजकीय पट पूर्णपणे बदलला. ज्या-ज्या ठिकाणी नीलेश लंके यांचे वर्चस्व होते, तिथे-तिथे विजयाची पताका विखे पाटलांच्या समर्थकांनी फडकवली. मग ती आमदारकीची निवडणूक असो किंवा विविध संस्थांच्या कारभारातील सत्ता असो, प्रत्येक ठिकाणी खासदार लंकेंना पराभवाची चव चाखावी लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.