Ahilyanagar Municipal Corporation

अहिल्यानगर या शहराचे पूर्वीचे नाव अहमदनगर होते. अहिल्यानगरची महापालिका 30 जून 2003 अस्तित्त्वात आली. महापालिकेत 68 नगरसेवक जनतेतून निवडून जातात. तर 05 स्वीकृत म्हणून निवडले जातात. महापालिका अस्तित्त्वात आल्यापासूनच शिवसेनेचे दिवंगतउपनेते अनिल राठोड यांचे वर्चस्व होतं. 2003 मध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 34 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भगवान फुलसौंदर हे ओबीसी समाजातील नेते महापौर झाले होते. तर शीला शिंदे या पहिल्यांदा महिला महापौर झाल्या. 2006 मध्ये शिवसेनेतील काही नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतल्याने काही वर्षे सत्तांतर झाले होते. त्यात शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप महापौर झाले होते. राठोड यांच्या निधनानंतर देखील शिवसेनेची सत्ता राहिली होती. प्रशासक येण्यापूर्वी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे मागासवर्गीय राखीवमधूनभाजपच्या मदतीने महापौर झाल्या होत्या. याच महापालिकेने नामांतराचा ठराव मंजूर केल्यानंतर शहराचे नाव बदलण्यात आले होते.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com