Ahilyanagar Mayor : कारभारी आलेत… मग महापौर यायचा कधी? सरकारनं हालचाल करताच आरक्षणाकडे वळल्या नजरा; अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादीचा दावा तगडा

Ahilyanagar Municipal Election: Ajit Pawar NCP Strong Claim for Mayor Post in BJP Alliance : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत, सर्वाधिक जागा जिंकलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस महापौर पदाचा प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे.
Ahilyanagar Mayor
Ahilyanagar MayorSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Municipal Election : दोन ते तीन वर्षांच्या प्रशासकीय काळातील अस्वस्थता संपली. आता अहिल्यानगर महापालिकेचा कारभार 68 नगरसेवक पाहतील. पण, या नगरसेवकांना महापौर, उपमहापौर कोण, याकडे लक्ष लागलं आहे. महापौर पदाचे आरक्षण अजून राज्य सरकारने निश्चित केलेले नाही.

अहिल्यानगर शहरासह राज्यभरातील 29 महापालिकांचे महापौरपदही आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात याची सोडत निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, अहिल्यानगर महापालिके अजित पवार राष्ट्रवादी 27 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापौर पदावर त्यांचा प्रबळ दावा असणार आहे. त्यांना फक्त प्रतीक्षा, आरक्षणाची आहे.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीने 27, तर भाजपने 25, जागा जिंकून या युतीने वर्चस्व मिळवले. त्यामुळे महापौरपदासाठी आता नगरसेवकांच्या खरेदी-विक्रीचा घोडेबाजार होण्याची शक्यता कमी आहे. महापौरपदी युतीचा नगरसेवक बसेल, असे या दोन्ही पक्षांकडून सांगितले जात असले, तरी या दोन्हींमध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादीच्या असल्याने पहिल्या टर्ममध्ये त्यांचा अधिकार असणार आहे व दुसर्‍या टर्ममध्ये भाजपला संधी मिळू शकते.

पण, हे सारे महापौरपदाच्या आरक्षणावर अवलंबून आहे. आरक्षण नेमके कोणते पडते व त्यासाठी समर्थ उमेदवार कोणाकडे आहे, यावर महापौरपद भाजप (BJP) की अजित पवार राष्ट्रवादी याचा निर्णय होऊ शकतो. मात्र, ज्याचा महापौर होईल, त्याच्या मित्र पक्षाला मग उपमहापौरपद व स्थायी समिती, अशी दोन महत्त्वाची पदे, तर सत्ताधारी पक्षाला महिला व बालकल्याण समिती व सभागृह नेतेपद मिळू शकते. याची आडाखे बांधणी दोन्ही पक्षांतून सुरू आहे. फक्त घोडे अडले आहे ते महापौरपदाचे आरक्षण कोणते पडते, या मुद्यावर.

Ahilyanagar Mayor
Navneet Rana controversy : नवनीत राणा यांचा भाजपमधून नायनाट करा! मुख्यमंत्र्यांना 22 जणांनी पत्रच धाडलं; फडणवीसांच्या निर्णयाकडे लक्ष!

राज्य सरकारने प्रशासनाकडून घेतली माहिती

सरकारने महापालिका प्रशासनाकडून महापौरपदाबाबतची माहिती मागविली होती व ती पाठवली गेली आहे. यापूर्वी कोणत्या प्रवर्गाला आरक्षण सोडण्यात आले होते. त्यासंबंधीची ही माहिती आहे. महापालिका स्थापन झाल्यापासून कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण पडले होते. त्याचा अहवाल सरकारनेला पाठविण्यात आला आहे.

Ahilyanagar Mayor
Nilesh Lanke Lok Sabha pattern : ‘डमी’ने केला गेम? शिंदेंच्या शिलेदाराचा धुव्वा; विखेंचा लोकसभा फॉर्म्युला पुन्हा चर्चेत!

फुलसौंदर अन् कोतकर

महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी 2003 मध्ये महापौर पदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निघाले होते. त्यावेळी शिवसेनेचे भगवान फुलसौंदर यांना प्रथम महापौरपदाचा मान मिळाला होता. त्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर 2006 मध्ये खुल्या प्रवर्गाला आरक्षण होते आणि काँग्रेसचे संदीप कोतकर महापौर झाले.

जगतापही होते महापौर

2008 मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आणि संग्राम जगताप पहिल्यांदा महापौर झाले. त्यानंतर 2010मध्ये महिला राखीव जागेवर शीला शिंदे महापौर झाल्या. 2013च्या निवडणुकीनंतर संग्राम जगताप दुसर्‍यांदा महापौर खुला प्रवर्गातून झाले. त्यानंतर वर्षभरात 2014मध्ये ते अहिल्यानगर शहराचे पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यांनी महापौरपद सोडले ते अभिषेक कळमकर यांना दिले गेले.

राष्ट्रवादीचा शिवसेनेला मिळाला होता पाठिंबा

यानंतर 2016च्या टर्ममध्ये महिला राखीव मध्ये सुरेखा कदम महापौर झाल्या. 2018च्या निवडणुकीनंतर भाजपचे पहिले महापौर बाबासाहेब वाकळे खुल्या प्रवर्गातून या पदावर बसले. त्यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2021च्या काळात राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने राखीव जागेवर रोहिणी शेंडगे या महापौर झाल्या. आता 2026मध्ये महापौरपदाचे आरक्षण काय पडते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com