Arun Jagtap : नगरकरांचे 'काका', माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन

Former MLA Arun Jagtap Father of NCP MLA Sangram Jagtap Passes Away in Ahilyanagar : अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन झाले.
Arun Jagtap
Arun JagtapSarkarnama
Published on
Updated on

Mla Sangram Jagtap father passed away : अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील विधान परिषदेचे माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप (वय 67) यांचे आज 2 मे रोजी पहाटं निधन झालं.

अहिल्यानगर शहरासह राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकारणात ते 'काका' म्हणून परिचित होते. काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर पुणे इथं उपचार सुरू होते. अरुणकाका यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता अहिल्यानगर शहरातील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होतील.

अरुण जगताप नगरकरांसाठी 'काका' नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे ते व्याही होते.

Arun Jagtap
Radhakrishna Vikhe Patil : शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊनही 'विखे पाटलांची' शिरजोरी... एवढं 'धाडस' कुठून आलंय?

अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून (Congress) सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवताच, ही कारकीर्द त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी टर्निंग पॉइंट ठरली. यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात मागे वळून पाहिलं नाही. जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

Arun Jagtap
Nilesh Lanke : ...म्हणून निलेश लंकेंनी अजितदादांच्या आमदारकीवर पाणी सोडत शरद पवारांची राष्ट्रवादी जवळ केली

अरुण जगताप यांनी विधानसभेसाठी दोन वेळा नशिब आजमावलं. त्यात ते पराभूत झाले. परंतु महापालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. जगताप यांचा परिवार वारकरी संप्रदायाचा, अरुणकाकांची पंढरपुरच्या 'विठ्ठला'वर नितांत श्रद्धा होती. पंढरपुरच्या 'वारी'च्या काळात ते अहिल्यानगरमधून जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत ते स्वतःला वाहून घ्यायचे. याशिवाय घोडेस्वारी, नवीन वाहनांचा छंद, शेती, हाॅटेल, उद्योग व्यवसायात त्यांना अधिक रुची होती.

अरुण जगताप यांचे पार्थिव अहिल्यानगर शहरातील राहत्या घरी सारसनगर इथं दुपारी दोन वाजता अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांच्यावर पुणे इथं खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अरुणकाकांवर पुण्यात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे समजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील काही मंत्री, नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. शेकडो कार्यकर्त्यांची रुग्णालयात दररोज गर्दी व्हायला लागल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी आवाहन करत, ही गर्दी थांबवली.

अरुण जगताप यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला दुपारी दोन वाजता ठेवल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा भवानीनगर निवासस्थानापासून, महात्मा फुले चौक मार्केटयार्ड, जिल्हा सहकारी बँक, स्वस्तिक चौक, टिळक रोड मार्गे, आयुर्वेद चौक, बाबावाडी, नालेगाव अमरधान इथं येईल. तिथं त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com