Rohit Pawar Vs Ram Shinde : सभापती शिंदेंनी पुन्हा टायमिंग साधलं; आमदार पवारांना सहावा धक्का

No-Confidence Motion Against Kailas Varat in Jamkhed NCP Ahilyanagar : आमदार रोहित पवार यांचे समर्थक जामखेड बाजार समितीमधील उपसभापती कैलास वराट यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आहे.
Rohit Pawar Vs Ram Shinde
Rohit Pawar Vs Ram ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar NCP updates : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना धक्क्यावर धक्के देणं सुरूचं ठेवलं आहे. आता जामखेड बाजार समितीत शिंदेंनी पवारांना धक्का देण्याची तयारी केली आहे.

आमदार पवार यांचे समर्थक बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्याविरूध्द अविश्‍वास प्रस्ताव आज जिल्हाधिकार्‍यांकडे दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, खरेदी विक्री संघ , कर्जत दूध संघ यानंतर आता जामखेड बाजार समितीमध्ये धक्का देत, शिंदेंनी आमदार पवारांना सहावा धक्का दिला आहे.

शरद कार्ले, सचिन घुमरे, नंदकुमार गोरे, अंकुश ढवळे, विष्णू भोंडवे, गौतम उतेकर, गणेश जगताप, वैजीनाथ पाटील, राहुल बेदमुथ्था, रवींद्र हलगुंडे, सीताराम ससाणे, नारायण जायभाय या सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला. कैलास वराट यांनी कायद्याचे उल्लंघन करून विश्‍वास गमावलेला आहे. ते मनमानी पध्दतीने कारभार करतात. बाजार समितीच्या उपविधीप्रमाणे कामकाज करताना हेतूपुर्वक आम्ही सुचवलेल्या बाबींकडे दुर्लक्ष करून हेळसांड करतात.

बाजार समितीमध्ये येणार्‍या शेतकर्‍यांना, नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून सदस्यांनी सुचवलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष करतात. बाजार समितीच्या क्षेत्रातील बाजाराची आर्थिक उन्नती होण्यासाठी त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या (Farmer) मालाला व्यवस्थित सोयी सुविधा करण्यासाठी कोणतीही मदत करत नाहीत, अशा तक्रारी सदस्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावात केल्या आहेत.

Rohit Pawar Vs Ram Shinde
Top Ten News : भाजप अध्यक्षांचं नाव ठरलं, विजयी सभा होणारच, शिवसेनेत नाराजीचा स्फोट; वाचा महत्वाच्या घडामोडी...

सरकारकडून वेळोवेळी निश्‍चित करण्यात आलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी व विक्री होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून कोणतीही मदत करत नाहीत. त्यामुळे उपसभापती कैलास वराट यांनी सदस्यांचा विश्‍वास गमावलेला आहे. त्यांना उपसभापतीपदावरून हटवण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी सदस्यांनी केल्याची माहिती बाजार समिती सभापती शरद कार्ले यांनी दिली.

Rohit Pawar Vs Ram Shinde
Sadabhau Khot Hindi ordinance : मराठी आमच्या रक्तात, मुलांनी इतर भाषा का शिकू नये? सदाभाऊ खोत यांचा सवाल

महाराष्ट्र (Maharashtra) कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 च्या नियमानुसार, जिल्हाधिकारी यांना, असे पत्र प्राप्त झाल्यानंतर, पंधरा दिवसांच्या आत समिती विशेष सभा आयोजित करून या विषयावर, समिती सदस्यांच्या मतदानाद्वारे निर्णय घेण्याबाबतची तरतूद आहे.

शिंदेंच्या राजकीय वेगाची चर्चा

कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकीय पटलावर सभापती प्रा. राम शिंदे आमदार रोहित पवार यांना शह देत सुसाट सुटले आहेत. कर्जत नगरपंचायतीत सत्तांतर घडवल्यानंतर, राम शिंदेंनी राजकीय वेग चांगलाच पकडला आहे. यात रोहित पवारांना शह देताना, राज्याच्या राजकारणात स्थिर होताना दिसत आहे.

राम शिंदेंच्या टायमिंगची चर्चा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) इथं झालेल्या मंत्रिमंडळाचा बैठकीनंतर राम शिंदेंचा हा राजकीय वेग चर्चेत आहे. आता पुन्हा पावसाळी अधिवेशनात जामखेड बाजार समितीमधील उपसभापती कैलास वराट यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यामागे राम शिंदेंनी अधिवेशनाचा टायमिंग साधला, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com