Sadabhau Khot Hindi ordinance : मराठी आमच्या रक्तात, मुलांनी इतर भाषा का शिकू नये? सदाभाऊ खोत यांचा सवाल

MLA Sadabhau Khot Slams Opposition Over Hindi Language Ordinance Revocation in Mumbai : हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश रद्द होण्यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी विरोधकांवर टीका केली.
Sadabhau Khot Hindi ordinance
Sadabhau Khot Hindi ordinanceSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics Sadabhau Khot : हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही अध्यादेश महायुती सरकारने रद्द केले. विरोधकांचा दबाव तसेच आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता, भाजपने हिंदीच्या मुद्यावर माघार घेतली. ठाकरे बंधूंनी यावरून राज्यात रान उठवले होते. पाच जुलैला मोर्चाचा इशारा दिला. पण महायुती सरकारने हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही अध्यादेश रद्द केल्याने आता विजय मेळावा घेण्याचे नियोजन सुरू केले आहे.

परंतु या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तोंड सुख घेत आहे. महायुतीमधील आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये 'भाषेत दारिद्र्य आणू नका, आमच्या रक्तात मराठी आहे. आमच्या मुलांनी उद्योग धंद्यासाठी इतर भाषा का शिकू नये?', असा सवाल केला आहे.

आमदार सदाभाऊ खोत यांनी हिंदी सक्ती रद्दच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, "जो महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी माणूस जन्माला येतो, त्याला मराठी बोलायला येतं. कारण त्याचे गुरू त्याचे आई-वडील असतात. मराठी आमच्या रक्तात आहे". आम्हाला इतर भाषा शिकायला मिळत असतील, आम्हाला उद्योग धंदा सुरू करायला, त्या जर उपयोगी पडत असतील, तर आमच्या मुलांनी त्या भाषा का शिकू नये? भाषेत दारिद्र्य आणू नका, असे देखील आमदार खोत यांनी ठणकावले.

आमदार सदाभाऊ खोत वारकऱ्यांचा वेश धारण करून विधिमंडळ परिसरात दाखल झाले होते. त्यावर बोलताना, शेतकरी (Farmer), शेतमजूर हा पांडुरंगाच्या वारीमध्ये लीन होतो. संत तुकाराम, ज्ञानोबांनी, नामदेवांनी ही वारी सुरू केली आणि 18 पगड जातीचे लोक पांडुरंगाच्या चरणी लीन व्हायला लागले, असे सांगून हा गावकऱ्यांचा खऱ्या अर्थाने वेश आहे, असे सांगितले.

Sadabhau Khot Hindi ordinance
Sangram Jagtap Objectionable Remarks: जगताप, पडळकर अन् लांडगेविषयी अपशब्द वापरणे भोवले; गुन्हा दाखल होताच दौंडचा शेख पसार

आम्ही आज वारकऱ्यांचा वेश धारण करून विधानसभेत आणि विधान परिषदेत गावातील प्रश्न मांडायला आलो आहे. विठोबाचा सांगावा सांगण्यासाठी इथं आलो आहोत, असे आमदार खोत यांनी म्हटले.

Sadabhau Khot Hindi ordinance
Ramdas Athawale Manoj Jarange Meeting : मंत्री रामदास आठवलेंचे जरांगे पाटलांशी गुप्तगू; मुंबईच्या आंदोलनावर ठाम

राज्य विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. उद्धव ठाकरेंना सत्ताधारी शिवसेनेने उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. यावेळी उद्धव ठाकरे देखील विधिमंडळ भवन परिसरात होते.

सत्ताधारी शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या हातात चाकू असल्याचे फलक घेत आंदोलनात झळकवले. राज्यात त्रिभाषा सुत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच स्वीकारले होते. त्यावर देखील त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सभापती राहुल नार्वेकर यांनी उद्यापर्यंत विधिमंडळाचे कामकाज स्थगित केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com