Hindu girl harassment case
Hindu girl harassment caseSarkarnama

Hindu girl harassment case : 'इस्लाम कबूल'साठी वेगळाच 'प्लॅन', शाहिद बनला 'वीरू'; युवतीच्या तक्रारीत धक्कादायक प्रकार उघडकीस

FIR in Ahilyanagar Newasa Hindu Girl Harassment Case : हिंदू मुलीच्या मागे लागून तिचा प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या मुस्लिम युवकाविरोधात श्रीरामपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Published on

Ahilyanagar crime news : समाज माध्यमांवर हिंदू नावाने बनावट ओळख तयार करून, त्यातून महाविद्यालयीन युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा, पुढे धर्मांतराची सक्ती करण्याचा आणि शारीरिक छेडछाड करून जबरदस्तीने पळून नेण्याची गंभीर घटना अहिल्यानगरच्या श्रीरामपूर इथं उघडकीस आली आहे.

संबंधित युवतीच्या तक्रारीवरून श्रीरामपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. शाहिद सादिक शहा (वय 25, रा. कुकाणा, ता. नेवासा) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, युवतीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत धक्कादायक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

पीडित युवती श्रीरामपूर (Shrirampur) शहरातील एका महिला वसतिगृहात राहून शिक्षण घेते. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन वर्षांपूर्वी ‘veeru’ नावाने सोशल मीडियावर तिला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव ‘विरू यादव’ असे सांगितले. मैत्री केली. काही महिन्यांच्या चॅटिंगनंतर तो प्रत्यक्षात मुस्लिम असून त्याचे खरे नाव शाहिद सादिक शहा असल्याचे उघड झाले. त्यानंतर तरुणीने त्याच्याशी संवाद तोडला.

तथापि, आरोपीने मागील काही महिन्यांपासून व्हॉट्सअ‍ॅप कॉल (Social Media) आणि मेसेजद्वारे सतत संपर्क साधत भेटीचा आग्रह धरला. यासाठी धमक्या देखील दिल्या. 30 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता नेवासा रोडवरील ‘आपली कॅफे’ इथं झालेल्या भेटीत आरोपीने प्रेमाचा प्रस्ताव मांडत तिच्यावर शारीरिक लगड केली. युवतीने ठाम नकार दिल्यानंतरही शाहिदकडून त्रास सुरूच राहिला.

Hindu girl harassment case
Sangram Jagtap Hindutva issue : अजितदादांनी आपल्या शिलेदाराला फटकारताच, भाजप मंत्री मैदानात; गुन्हा दाखल होऊनही संग्राम जगताप बीडची सभा गाजवणार?

10 ऑक्टोबरला शाहिदने युवतीला सकाळी पुन्हा धमकीचा फोन केला. त्यामुळे युवती घाबरली अन् भेटण्यासाठी कॅफेत गेली. तिथे शाहिदने युवतीबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. युवतीच्या इच्छेविरुद्ध मोटारसायकलवर बसवून घेतले अन् नेवासा दिशेने घेऊन जाऊ लागला. दरम्यान, युवतीने तिच्या नातेवाईकांना याबाबत संपर्क करून माहिती दिली होती. शाहिदचा पाठलाग करून त्याला पकडले. तसंच पोलिसांना देखील कळवले.

Hindu girl harassment case
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पश्चाताप; शिदेंच्या बंडावर पहिल्यांदाच सर्वात मोठं विधान; म्हणाले,'...तर शिवसेना फुटलीच नसती!'

युवतीला धरलं वेठीस

हरेगाव फाट्याजवळ शाहिदला अडवण्यात आले. त्यावेळी शाहिद याने युवतीच्या गळ्याला चॉपर लावून “कोणी जवळ आला, तर तिला ठार मारीन”, अशी धमकी दिली. तसं फिर्यादीत नमूद आहे. नातेवाईकांनी आणि नागरिकांच्या मदतीने युवतीची सुटका करण्यात आली. यावेळी जमावाने केलेल्या हल्ल्यात शाहिद गंभीर जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याला उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

युवतीची गंभीर तक्रार

युवतीने फिर्यादीत गंभीर तक्रारी केल्या आहेत. आरोपीने खोटे हिंदू नाव धारण करून फसवणूक केली, वारंवार धमक्या दिल्या, धर्मांतराचा दबाव देखील टाकला, लज्जा उत्पन्न होईल, अशी शारीरिक छेड काढली. तसेच जबरदस्ती मोटारसायकलवर पळवून नेण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांत गंभीर स्वरूपाच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.

धर्मांतरासाठी आग्रह

'आपली कॅफे' या ठिकाणच्या भेटीत, शाहिदने युवतीला एकदम धर्मपरिवर्तनासाठी गळ घातली. तुमच्या धर्मात दम नाही, तू आमचा इस्लाम कबूल कर, मी तुला खुश ठेवीन, असे म्हणत धर्मांतरासाठी आग्रह धरला. यावर युवतीने त्याला विरोध केला, याचा त्याला राग आल्याने शाहिदने युवतीवर हल्ला केला. गालावर नखाने ओरखडे काढले. तसेच हाताने जोरदार चापट मारून युवतीला जबरदस्तीनं नेलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com