AAP win in Newasa : भाजपचा मंत्री, शिंदेचा आमदार, माजी मंत्री अन् माजी आमदारांचं तगडं आव्हान, तरी केजरीवालांच्या महिला शिलेदाराचा नेवाशात दमदार विजयश्री!

Ahilyanagar AAP Shalini Sukhadan Wins Newasa Nagar Panchayat Election : नेवासा नगरपंचायत निवडणुकीत एक जागा जिंकत अंरविद केजरीवाल यांच्या आप पक्षाने राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खातं खोललं आहे.
AAP Shalini Sukhadan
AAP Shalini SukhadanSarkarnama
Published on
Updated on

Aam Aadmi Party Maharashtra : नगरपालिका आणि नगरपंचयाती निवडणुकीत राज्यात सत्ताधारी भाजप महायुतीचा दबदबा राहिला. परंतु राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारामध्ये दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची एन्ट्री झाली आहे.

नेवासा नगरपंचायतीमध्ये आम आदमी पक्षाच्या शालिनी सुखदान यांनी विजय मिळवला आहे. भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ शिंदे शिवसेना आमदार विठ्ठल लंघे, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे या दिग्गज नेत्यांचे आव्हानावर मात करत, शालिनी सुखदान यांनी 'आप'चा झाडू घेत नेवाशाच्या नगरपंचायतीमध्ये दमदार एन्ट्री घेतली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा नगरपंचायत निवडणुकीत शालिनी सुखदान यांच्या रूपाने आम आदमी पक्षाने राज्यात प्रथमच खाते खोलले. राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी अभिनंदन करून, दिल्लीचे नेते तथा महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी प्रकाश जरवाल यांच्यामार्फत शुभेच्छा संदेश पाठवला. माजी आमदार जरवाल यांनी नेवासा इथं येत विजयी नगरसेविका शालिनी सुखदान आणि त्यांचे पती ॲड. संजय सुखदान दाम्पत्याचा सत्कार केला.

शालिनी सुखदान यांच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीवेळी प्रकाश जरवाल यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष अजित फाटके, जिल्हाध्यक्ष राजू आघाव, तालुकाध्यक्ष ॲड. सादिक शिलेदार, शहराध्यक्ष संदीप आलवणे उपस्थित होते. तालुकाध्यक्ष सादिक शिलेदार यांनी स्वागत केले. महाराष्ट्रात (Maharashtra) आगामी होणाऱ्या महापालिकांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार असून, पक्षाच्या प्रचारासाठी देशातून सुमारे चाळीस स्टार प्रचारक येणार असल्याची माहिती प्रकाश जरवाल यांनी दिली.

AAP Shalini Sukhadan
Thackeray property case And Pawar criminal petition : ठाकरेंची बेहिशेबी मालमत्ता.., तर पवारांचे लवासा हिल स्टेशन..; दाखल याचिकांवर न्यायालयाचा मोठा निर्णय

संजय सुखदान यांचं पक्षात स्टार प्रमोशन

आम आदमी पक्षाने नेवासा नगरपंचायतीत विजयश्री प्राप्त करून महाराष्ट्रात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खाते खोलल आहे, त्याबद्दल त्यांनी अहोरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. आम आदमी पक्ष नेवासा शहराच्या हितासाठीच काम करेल, असे स्पष्ट करून त्यांनी सुखदान यांच्या रूपाने पक्षाला एक चांगला नेता मिळाला आहे. पुढील निवडणुकीत सुखदान हे राज्याचे स्टार प्रचारक असतील, असेही प्रकाश जरवाल यांनी सांगितले.

AAP Shalini Sukhadan
Uddhav & Raj Thackeray Finalise Strategy : ठाकरे बंधू उमेदवार कधी जाहीर करणार? रणनीती ठरली, राज यांची ‘मराठी कार्ड’ची ताकद अन् उद्धव यांची संघटनात्मक बांधणी!

महाराष्ट्रात भ्रष्टाचार करण्याची संख्या अधिक

आमचे उद्दिष्टच भ्रष्टाचार मुक्त देश असावा हे आहे. त्यात महाराष्ट्रात भ्रष्टाचार करणाऱ्याची संख्या जास्त असल्याचे सांगत हा भ्रष्टाचारच आम्हाला उखडून फेकायचा आहे, असेही प्रकाश जरवाल यांनी म्हटले.

महापालिका स्वबळावर लढणार

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके म्हणाले, नेवासा शहराच्या विकासासाठी सहकार्याची भूमिका पक्षाची असेल राज्यात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका या आम आदमी पक्ष स्वबळावर लढविणार असून, तशी मोर्चेबांधणी ही पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com