Devendra Fadnavis Social Initiative: संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील मुलं 'लढाऊ' शिक्षण घेणार; सीएम फडणवीसांनी घेतली जबाबदारी

Devendra Fadnavis Assures Free Education for Santosh Deshmukh Children: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत बीडमधील मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील मुलांची शैक्षणिक जबाबदारी स्वीकारली.
CM Fadnavis Assures Military Education for Deshmukh's Children
CM Fadnavis Assures Military Education for Deshmukh's ChildrenSarkarnama
Published on
Updated on

Govt Support For Santosh Deshmukh Children: बीड जिल्ह्यातील मस्सोजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची अन्यायाविरुद्ध लढताना निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा विराज व पुतण्या सत्यजित देशमुख देखील ‘लढाऊ’ शिक्षण घेणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने त्यांना आठवी ते बारावीपर्यंत सैनिकी शाळेत मोफत शिक्षण मिळणार आहे.

विराज व सत्यजित आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीत भावनिक संवाद घडून आला आणि त्यातून एक अत्यंत संवेदनशील व दूरदृष्टीचा निर्णय झाला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विराज आणि सत्यजित यांच्या आठवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत, त्यांच्या दोघांचेही शिक्षण सांगली जिल्ह्यातील रेठरेधरण येथील नामांकित एस. के. इंटरनॅशनल सैनिकी शाळा (School) इथं व्यवस्था केली आहे.

CM Fadnavis Assures Military Education for Deshmukh's Children
Kundamala Bridge Collapsed : तीन जण बेपत्ता? 51 जणांना वाचवण्यात यश, जखमींपैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक; प्रशासनाच्या 'रेस्क्यू ऑपरेशन'ला पावसाचा अडथळा

न्याय मिळविण्यासाठी कायदेशीर लढा सुरू असतानाच, मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याने समाजात सकारात्मक उदाहरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आमदार अभिमन्यू पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी आमदार सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते.

CM Fadnavis Assures Military Education for Deshmukh's Children
Malvan Rajkot Fort : धक्कादायक! नव्यानं उभारणी केलेल्या राजकोट किल्ल्यावरील महाराजांच्या पुतळ्याजवळील भाग खचला

आजचे आंदोलन पुढं ढकललं

दरम्यान, दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी, या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी देशमुख कुटुंबीय व मस्साजोग ग्रामस्थं पुन्हा आज रस्त्यावर उतरणार होते.

कृष्णा आंधळे अद्याप फरार

ग्रामस्थांनी यासाठी ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, 16 जून हा शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हे आंदोलन 20 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सहा महिने पूर्ण झाले आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आदी कोठडीत आहेत. मात्र, कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com