
Ahilyanagar Rahuri farmers facilities : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राहुरी इथं त्यांच्या हस्ते शेतकरी निवास आणि उपहारगृहाच्या इमारतीचं उद्घाटन झाले. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी यानिमित्ताने कार्यकर्ता मेळावा घेतला.
अजितदादांची या मेळाव्याला दमदार एंट्री घेतली. व्यासपीठावर स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना अभिवादन करताच अजितदादांची नजर खुर्च्यांवर पडली. या खुर्च्यांमध्ये अंतर होते. ते अजितदादांना खटले अन् त्यांनी खुर्च्या पुन्हा सेट करत, एकमेकांना चिटकून घेतल्या. अजितदादांच्या या कृतीमुळे व्यासपीठावर काहीशी धावपळ उडाली. यानंतर अजितदादांना भाषणांची सुरवात, 'मी कामाचा माणूस', असे म्हणत करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
राहुरीमधील बंद पडलेल्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकताच झाली. चार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला महायुतीचा (Mahayuti) पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवला होता. विखे पिता-पुत्रांनी या निवडणुकीत हाताची घडी घालून बांधावर उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे लढत तनपुरेविरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पॅनलमध्ये झाली.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पॅनलने निवडणुकीत महायुतीच्या प्रमुख तिन्ही चेहऱ्यांचा वापर केला. बॅनरबाजी देखील फोटो वापरले. परंतु अरुण तनपुरे यांनी राज्यात घड्याळ सत्तेत असून, सहकार खाते आपल्याच माणसांच्या हातात आहे. लवकरच तुम्हाला गोड बातमी देईल, असे सांगून वातावरण बदलून टाकले. अरुण तनपुरे यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पार्टी पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील प्रचार उडी घेतली. अरुण तनपुरे यांनी या जोरावर कारखान्याची एकहात्ती सत्ता काबिज केली.
अरुण तनपुरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र त्यांचे पुतणे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांच्या 'तुतारी'चा आपण निष्ठावान असल्याचे सांगितले. काका-पुतण्यांच्या वेगळ्या भूमिकांमुळे राहुरीतील राजकारणात मोठे उलटफेर पाहायला मिळत आहेत.
आता राहुरी इथं कार्यकर्तांचा मेळावा घेताच त्याला अजितदादांनी उपस्थिती लावली. अजितदादांची कार्यक्रम स्थळी दमदार एंट्री झाली. व्यासपीठावर येताच त्यांना खुर्च्यांमधील अंतर खटकले अन् त्यांनी खुर्च्या सेट केल्या. अजितदादांच्या या कृतीमुळे आयोजकांची धावपळ उडाली.
अजित पवार यांनी, भाषणात मी कामाचा माणूस, असल्याचे सांगितले. आम्ही सर्व, राष्ट्रवादी, शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेने काम करतो आहोत. समाजात तेढ निर्माण होणार नाही ही आपली जबाबदारी मानतो. जातीय सलोखा राखून आम्ही काम करतोय. वारकरी संप्रदाय आणि महापुरुषांचा विचार महत्वाचा मनतो आणि हेच विचार राज्याला आणि देशाला मजबूत करणार हे पुन्हा ठासून सांगितले.
'चौंडी येथे राजमाता अहिल्यादेवींचे भव्य स्मारक होणार आहे. विधानसभेला महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. आजतागायत एवढे बहुमत कोणत्याच सरकारला मिळाले नाही. जनतेने जनतेचे काम केलंय. आता जनतेने प्रश्न सोडविण्याचे काम आम्ही करतोय. मी माझ्या कामाची सुरवात सकाळी लवकर करतो. एवढ्या लवकर कामाची सुरवात कुणीच करत नसतो. मी कामाचा माणूस', असेही अजितदादा यांनी म्हटले.
हिंजवडी इथल्या आयटी पार्कचा दौऱ्यात सरपंचाला झापलं, या मुद्यावर अजितदादांनी पुन्हा भाष्य केले. चॅनलवाले ठराविक गोष्टीच दाखवतात. हे सगळे माझेच कार्यकर्ते आहेत. काम करताना काय अपेक्षा आहेत, हे त्यांना सांगायला नको? कार्यकर्त्यांनो, अशा काही क्लिप आल्या तर वेगळं समजू नका, असे आवाहन अजितदादांनी केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.