BJP Kirit Somaiya PUNE : मशिदींबाबत धक्कादायक माहिती समोर; किरीट सोमय्यांनी मागवली होती पुणे पोलिसांकडे माहिती

BJP Kirit Somaiya Exposes Illegal Loudspeakers at Pune Religious Site via RTI : भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांबाबत माहिती अधिकार कायद्याद्वारे काही माहिती पोलिसांकडून मागवली.
BJP Kirit Somaiya
BJP Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांबाबत माहिती अधिकार कायद्याद्वारे काही माहिती पुणे पोलिसांकडून मागवली होती.

ती माहिती पुणे पोलिसांनी किरीट सोमय्या यांना दिली असून त्यातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पुणे (Pune) जिल्ह्यातील धार्मिक स्थळ हा वादाचा विषय ठरत आहेत. पुणे जिल्ह्यातील काही गावांनी धार्मिक स्थळांमध्ये गावाबाहेरील व्यक्तींना प्रार्थना करण्यास मनाई केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्याच बरोबर धार्मिक स्थळांवरील भोंगे हे नेहमीच वादाच्या केंद्रभागी राहिले आहेत. याच विषयावर किरीट सोमय्या यांनी पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांची माहिती मागवली आहे.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुणे ग्रामीण पोलिसांना पुणे जिल्ह्यामध्ये किती धार्मिक स्थळ (मशिदी) आहेत. याबाबत माहिती अधिकारातून प्रश्न विचारला होता. त्यावर पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीतून जिल्ह्यामध्ये 347 धार्मिक स्थळ असल्याचे समोर आलं आहे . तर 347 धार्मिक स्थळांपैकी 308 धार्मिक स्थळांवर भोंगे किंवा लाऊड स्पीकर लावण्यात आले असल्याचं समोर आला आहे.

BJP Kirit Somaiya
Nagpur child mortality rate : धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच बालमृत्यूंचे प्रमाण अधिक; ग्रामीणपेक्षा मुंबईत भयावह स्थिती

मात्र यामध्ये धक्कादायक माहिती अशी की 308 धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यात आलेले असले तरी पुणे जिल्ह्यातील अवघ्या 52 धार्मिक स्थळांनीच पुणे पोलिसांकडून हे भोंगे लावण्या बाबतची परवानगी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

BJP Kirit Somaiya
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या पुरुषांचं आता काही खरं नाही? अजितदादांसह बावनकुळेंचा थेट इशारा; म्हणाले, 'पै अन् पै...'

त्यामुळे 256 इतके भोंगे हे पुणे जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये किरीट सोमय्या हे पुणे जिल्ह्यातील बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या भोंग्यांविरोधात आक्रमक होतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये या भोंग्याच्या विषयावरून आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com