Shani Shingnapur fake app scam
Shani Shingnapur fake app scamSarkarnama

Shani Shingnapur fake app scam : 'शनैश्वर' अ‍ॅप घोटाळा; CM फडणवीसांचा इशारा, तरी गुन्ह्यासाठी देवस्थान पुढं येईना, सायबर पोलिसांची फिर्याद

Fake App Fraud at Ahilyanagar Shanishwar Temple Case Registered at Shani Shingnapur Police Station : नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थानची व भाविकांची अ‍ॅप अन् वेबसाईटचा वापर करत भाविकांची आर्थिक फसवणुकीबाबत गुन्हा दाखल.
Published on

Ahilyanagar Shanishwar Temple fraud : अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थानमधील आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारासोबत तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा विधिमंडळात चांगलाच गाजला. याशिवाय बनावट अ‍ॅपद्वारे भाविकांची लूटप्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देववस्थानमधील भ्रष्टाचाराची भयावह परिस्थितीवर भाष्य करत गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले.

विधिमंडळातील या राजकीय गरमागरमीनंतर आता शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात 'शनैश्वर देवस्थान'च्या भाविकांची बनावट अ‍ॅपद्वारे लूट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच बनावट अ‍ॅपच्या लिंक पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सापडल्या असून, त्याच्या चालक-मालक आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात ही गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

अहिल्यानगरमधील सायबर पोलिस (Police) ठाण्यात शनैश्वर देवस्थानचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी देवस्थानची व भाविकांची बनावट दर्शन अ‍ॅपद्वारे फसवणूक होत असल्याची तक्रार चार जून दिली होती. अशीच तक्रार आणखी दोघांनी देखील दिली होती. सायबर पोलिसांकडून या अर्जांची तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी केली. यात तथ्य आढळले. यानुसार शनैश्वर देवस्थानला संपर्क साधून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या.

सायबर पोलिसांनी (cyber crime) फिर्याद दाखल करण्याची सूचना केली, तरी देवस्थान प्रशासनाकडून फिर्याद देण्यात आली नाही. भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असल्याने हे प्रकरण संवेदनशील असल्याचे लक्षात घेऊन भाविकांची अन् संस्थानची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी सायबर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सुदाम काकासाहेब काकडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला.

Shani Shingnapur fake app scam
Nagar Urban Bank scam : नगर अर्बनभोवती आता 'ईडी'चा फेरा; राजेंद्र गांधींकडील पुराव्यांची शहानिशा करणार

उपनिरीक्षक काकडे यांच्या फिर्यादीनुसार https://gharmandir.in, https://onlineprasad.com, https://pujapariseva.com, https://hariom.app/home/DEFAULT आणि https://epuja.com या URLचे चालक अन् मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 'शनैश्वरा'चे VIP दर्शन बुकिंग, ऑनलाईन पुजा, अभिषेक व तेल चढावा बुकिंग करीता कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता व शनैश्वर देवस्थानची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

Shani Shingnapur fake app scam
Vinod Nikole : नक्षलवाद संपलाय, मग 'जनसुरक्षा'ची काय गरज? 'गब्बर' भाजप महायुतीला मार्क्सवादीचा आमदार भिडला

शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात बीएनएस कलम 318 (4), 336(3), 3(5) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम 66 (D) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी शनिभक्तांना आवाहन केले आहे. वरील अ‍ॅपद्वारे फसवणूक झालेल्या भाविकांनी सायबर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी. तसेच वरील बनावट अॅपद्वारे कोणतीही देणगी पाठवू नये, असे म्हटले आहे. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोरेश्वर पेंदाम आणि त्यांचे पथक गुन्ह्याचे तपास करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com