
Ahilyanagar news : जगप्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साईसमाधी मंदिर पाइप बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल आला आहे. यापूर्वी देखील साई संस्थानला धमकीचे मेल, पत्र आलेले आहेत. परंतु जम्मू-काश्मीर इथं पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानला आलेल्या धमकीमुळे पोलिस दल चांगलच 'अलर्ट मोड'वर आलं आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी कालच साई समाधीचं दर्शन घेतलं होतं. तिथंच त्यांनी दहशतवादी हल्ल्याचं कसं प्रत्युत्तर दिलं जाणार यावर आता फक्त अॅक्शन बघा, असं सूचक विधान केलं होतं. केंद्रीय मंत्र्यांचा दौरा उरकून काही तास होत नाही, तोच साई संस्थानला धमकीचा मेल आल्यानं खळबळ उडाली आहे.
शिर्डीतील (Shirdi) साई संस्थानला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल मिळाला आहे. आज सकाळीच या धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये आणखी काय आहे, याबाबत अजून काही खुलासा झालेला नाही. पोलिसांनी या मेलविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.
साई संस्थानला यापूर्वी देखील धमकीचे मेल आले आहेत. तपासात हे मेल फेक निघाले होते. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी (Terrorist) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात संतापाची लाट असतानाच, जगप्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईसंस्थान मंदिराला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या मेलमुळे खळबळ उडाली आहे. या धमकीच्या मेलमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून, हा मेल खरचं धमकीचा आहे की, कोणी खोडसाळपणा केला, याचा तपास पोलिस घेत आहे.
दरम्यान, PM नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील काल राहाता तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनीही साईसमाधीचं दर्शन घेतलं होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं काय प्रत्युत्तर असेल, यावर 'आता फक्त ॲक्शन पाहा...ॲक्शन!', एवढचं उत्तर दिलं होतं.
मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत राहाता इथल्या गोदावरी कालव्याच्या नुतनीकरणाचा प्रारंभ झाला. त्यावेळी त्यांनी सत्कार देखील नाकारला. जोपर्यंत पहलगाम घटनेचा बदला घेतला जाणार नाही, तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नसल्याचा संकल्प असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) इथं सहा मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. ही बैठक पहिल्यांदाच ग्रामीण भागात होत आहे. राज्याची संपूर्ण यंत्रणा तिथं गुंतली आहे. यातच शिर्डी साईसंस्थानला मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल आल्यानं खळबळ उडाली आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.