Trupti Desai On Women Commission : ज्योती साळुंके हुंडाबळी प्रकरणाचं 'रि-इन्वेस्टिगेशन'; तृप्ती देसाई महिला आयोगाच्या अध्यक्षांवर कडाडल्या

Trupti Desai Slams Women Commission Over Jyoti Salunke Dowry Death in Ahilyanagar: श्रीरामपूर हुंडाबळी प्रकरणात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन घटनेबाबत गंभीर आरोप केले.
Trupti Desai
Trupti Desai Sarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Shrirampur Dowry Death: श्रीरामपूरमधील ज्योती साळुंके हिचा सासरच्यांनी छळ करून खून केल्याच्या 2021 मधील घटनेच्या प्रकरणाचा फेरतपास स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत होणार असल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आश्वासन दिले.

या प्रकरणात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मयत विवाहिता ज्योती हिच्या माहेरच्या नातेवाईकांसह पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तृप्ती देसाई यांनी ही माहिती देताना, महिला आयोगाच्या कारभारावर निशाणा साधला.

हुंड्यासाठी छळ करून संशयास्पद मृत्यू झालेल्या ज्योती मोहित साळुंके (रा. चितळी स्टेशन, ता. राहाता) या प्रकरणाची सीआयडी किंवा एसआयटीमार्फत चौकशी करावी, शवविच्छेदन अहवालात तफावत दाखवणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यास सहआरोपी करावं, पुरावे नष्ट करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे. पोलिस (Police) अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेत तक्रार देखील केली आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी मयत ज्योतीचा भाऊ सचिन अनर्थे, वडील नानासाहेब अनर्थे (रा. चंद्रापूर, ता. राहाता) यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती मांडली. तृप्ती देसाई म्हणाल्या, "पुण्यातील (Pune) वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या गुन्ह्याचा तपासात विविध फाॅरेन्सिक तपासण्या होत आहेत. सर्वांनीच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. त्यामुळे अनर्थे कुटुंबियांना देखील न्याय मिळेल, अशा अपेक्षा वाढल्या आहेत".

Trupti Desai
Gopinath Munde Memorial Controversy: 'AIMIM' इम्तियाज जलील यांना थेट बीड, परळीतून धमक्या; काय होतं कारण...

ज्योतीचा विवाह 2017 मध्ये मोहित साळुंके याच्याशी झाल्यानंतर सासरच्यांनी तिचा पाच लाख रूपयांसाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. ज्योतीच्या वडिलांनी अडीच लाख रूपये देऊनही छळ थांबला नाही. अखेर 20 जून 2021 रोजी ज्योतीचा संशयास्पद मृत्यू झाला.

Trupti Desai
IAS Officers Transfer: फडणवीस सरकारकडून प्रशासनाला पुन्हा एकदा बदल्यांचा धक्का; 'या' 8 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

उत्तरीय तपासणीचे तीन अहवाल

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ज्योतीच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचे तीन अहवाल आहेत. सुरूवातीच्या अहवालात अंगावर जखमी नसल्याचे म्हटले आहे. या घटनेत अनेक महत्त्वाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात योग्य पुरावे सादर न केल्याने आरोपींना जामीन झाला.

आरोपी पतीचा भाऊ मंत्र्यांच्या जवळचा

उत्तरीय तपासणीचे तीन अहवाल देणारा वैद्यकीय अधिकारी हा आरोपीचा मित्र आहे. त्याला सहआरोपी करण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे अनर्थे कुटुंबियांनी केली. ज्योतीचा भाऊ सचिन याने आरोपी पतीचा भाऊ राजकीय पार्श्वभूमीचा असून, त्यानेही तपासात हस्तक्षेप केला. तो मंत्र्यांच्या जवळचा आहे, असा दावा देखील केला.

महिला आयोगाच्या अध्यक्ष राजकीय सुट्टीवर...

राज्यात महिलांवर अत्याचार, हुंडाबळीच्या घटना वाढत असताना महिला आयोग निष्क्रिय असल्याची टीका तृप्ती देसाई यांनी केली. महिला आयोगाची अध्यक्षा ही कोणत्याही राजकीय पक्षाची पदाधिकारी नसावी. या पदावर राजकीय व्यक्ती असल्याने अनेक प्रकरणं मिटवली जातात.

अध्यक्ष पूर्णवेल महिलांसाठी काम करणारा असावा, असे सांगताना राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी महिला आयोगाने सुट्टीवर गेल्याचा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला. महिला आयोगात इतर सदस्य असतात, ते अजून नियुक्त नाहीत. कुणी सदस्य पदासाठी अर्ज केल्यावर त्याला अगोदर पक्षात प्रवेश करा असे सांगितले जाते, असा गंभीर आरोप देखील तृप्ती देसाई यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com