Local Body Elections : इच्छा आमची पुरी करा; पती-पत्नीमध्ये तिकिटासाठी रेस, याशिवाय एकाच घरातील तिघांची "फिल्डिंग"

Husband-Wife and Family Members Compete in Shrirampur Election : अहिल्यानगर श्रीरामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर उमेदवारांचा प्रचार अक्षरशः धुरळा उडवून दिला आहे.
Local Body Elections
Local Body ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Shrirampur municipal election : श्रीरामपूर नगरपरिषदेची निवडणूक अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय केंद्रबिंदु ठरली. इच्छुकांच्या वाढत्या संख्येने वरिष्ठांची डोकेदुखी वाढली आहे. विखे पिता-पुत्राच्या एन्ट्रीने तर, राजकीय धुरळाच उडाला आहे. कोण निवडणुकीच्या रिंगणात असणार अन् कोण बाहेर, रिंगणाच्या बाहेर कोण-कोणाची जिरवणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

असे असतानाच, रिंगणात राहाण्यासाठी इच्छुकांची फौजेचा सामना पक्ष नेतृत्व कसा करणार, याची चर्चा रंगली असतानाच, श्रीरामपूर नगरपरिषदेसाठी पती-पत्नी दोघांनी महायुतीकडे उमेदवारीचा हट्ट धरला आहे. याशिवाय एकाच कुटुंबातील तिघांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे श्रीरामपूर नगरपरिषदेची निवडणूक जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत आहे.

नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर (Social Media) उमेदवारांचा प्रचार अक्षरशः धुरळा उडवून दिला आहे. पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नसली तरी, अनेकांनी इच्छुकांनी एक्स, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसारख्या माध्यमाद्वारे आपला प्रभाग आणि उमेदवारी थेट जाहीर केली आहे. काहींनी तर प्रचाराची सुरूवातच सोशल मीडियावरून केली असून, बॅनर्स, रील्स, व्हिडिओ आणि शुभेच्छा संदेशांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत आपली ओळख पोहोचविण्याची स्पर्धा सुरू आहे.

याच एकाच कुटुंबातील तिघांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली असून, यातील कोण-कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या (Municipal Corporation) रिंगणात असेल, याची चर्चा आहे. पती–पत्नी दोघांनीही महायुतीच्या माध्यमातून उमेदवारीचा हट्ट धरला आहे. या दाम्पत्याची इच्छा ल्याचे समजते. आता पक्षाचे वरिष्ठ नेते हा हट्ट कसा पुरवतात आणि तिकीट कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Local Body Elections
Eknath Shinde Shiv Sena : महायुतीत फूट, शिंदेंचे शिलेदारांना घ्यायचाय वचपा; शिवसेनेचा स्वबळाचा नारा

NCPच्या मुलाखती

दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडल्या. प्रदेश सरचिटणीस अरुण नाईक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहराध्यक्ष प्रवीण काळे उपस्थित होते.

Local Body Elections
Kadam Vs Kadam Politics: ठाकरे-भाजप म्हणजे विळ्या-भोपळ्याचे वैर, त्यात उफाळली कदमांची भाऊबंदकी; राजकीय अस्तित्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार?

विखे-आदिक भेट

श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या संभाव्य समीकरणांवर चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात युती होणार का? या चर्चांना नवीन वळण मिळालं. माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी नुकतीच लोणी इथं माजी खासदार सुजय विखे पाटील यांची भेट घेतली. याच दिवशी श्रीरामपूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनीही विखे पाटील यांची भेट घेतली. या घडामोडींमुळे श्रीरामपूर युतीबाबत निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

काँग्रेसचा उमेदवार ठरला

काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी करण ससाणे यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. यंदा काँग्रेसने 80 टक्के नवीन चेहऱ्यांना पसंती देत मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी दिल्याचे दिसत आहे. नगरसेवक पदाच्या 34 जागांपैकी सुमारे 90 टक्के उमेदवार काँग्रेसकडून निश्चित करण्यात आल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com