Sispe Gromor companies fraud : गल्लीतला घोटाळा दिल्लीत गाजणार? अमित शहा लक्ष घालणार? विखेंबरोबर लंकेंनी देखील ठोकला शड्डू!

CBI Probe Sought Into Sispe Gromor Companies Scam in Ahilyanagar | Vikhe Patil, Nilesh Lanke : अहिल्यानगर जिल्ह्यात सिस्पे, ग्रोमोअर कंपन्यांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयमार्फत चौकशीची मागणी विखे अन् लंकेंनी केली आहे.
Sispe Gromor companies fraud
Sispe Gromor companies fraudSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar financial scam : भरगच्च अमिषाचा परतावा देण्याच्या आमिषाने हजारो लोकांना गंडवणाऱ्या अहिल्यानगरमधील 'सिस्पे' आणि 'ग्रोमोअर' कंपन्यांच्या घोटाळ्याची 'सीबीआय' चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे लक्ष वेधण्यात आलं आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फसवणूक झालेल्या महिलांद्वारे निवेदन देत ही मागणी केली आहे, तर खासदार नीलेश लंके यांनी देखील आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे निवेदन देत, केंद्रीय गृहमंत्रालयाकडे मागणी केल्याचे सांगितले. तसंच आपल्याला या घोटाळ्यात गोवण्यात येत आहे, याकडे देखील नीलेश लंकेंनी लक्ष वेधलं.

गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात 'सिस्पे' आणि 'ग्रोमोअर' या फायन्सास कंपन्यांमधील कोट्यवधीचा घोटाळा गाजत आहे. यात हजारो गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकी गुंतल्या आहेत, तर कंपन्यासांठी एजंटगिरी करणारे शेकडोजण अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे, सरकारी अधिकारी, कर्मचारी देखील एजंट म्हणून समोर येत आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून, यामागे राजकीय संशय भाजप अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी व्यक्त केला आहे.

या कंपन्यांमधील राजकीय हस्तक्षेपाच्या चौकशीसाठी, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे 'सीबीआय' चौकशीची मागणी करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी, मुख्यमंत्री फडणवीस आले असताना, त्यांना मंत्री विखे पाटील यांनी घोटाळ्यातील पीडित समृद्धी घुले यांच्या कुटुंबीयांमार्फत निवेदन दिले.

Sispe Gromor companies fraud
Nilesh Lanke On Sangram Jagtap controversy : लंकेंनी जगतापांवर साधला निशाणा; सरकारी बाॅडीगार्डचा गैरवापर, भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा दिला इशारा

मंत्री विखे पाटील यांनी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे म्हटले. 'या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीठी सीबीआयमार्फत चौकशी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊ. तसंच गरिबांचा पैसा खाल्ला त्यांना तुरुंगाची हवा खायला लावू,' अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

Sispe Gromor companies fraud
AIMIM BJP alliance : 'AIMIM'नं बिनशर्त पाठिंबा काढून घेतला; भाजपच्या अकोट मंचासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही धाडलं पत्र!

दरम्यान, या घोटाळ्यावर खासदार नीलेश लंके यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, "सिस्पेचा घोटाळा झाला, तेव्हा मी पवारसाहेबांना भेटून पत्र दिलं. मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं. माझ्या पत्राचा अभिप्राय धरून, पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना चौकशी करावी, असं पत्र दिलं." देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहून या सिस्पे घोटाळ्यातील फसवणूक करणाऱ्यांना अटक झाली पाहिजे. सर्वसामान्यांना दिलासा मिळाला पाहिजे, अशी अपेक्षाही खासदार लंके यांनी म्हटले.

उद्घाटनाला गेलो म्हणून आरोप

'सिस्पे घोटाळ्यात एक बँक होती. त्या बँकेच्या उद्घाटनाला नीलेश लंके गेला. त्या बँकेच्या उद्घाटनासाठी समाजसेवक अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, वेगवेगळ्या पक्षाच्या आमदार, लोकप्रतिनिधींची नावे होते. पोलिस अधिकाऱ्यांची नावे होती. आम्ही तिथं उद्घाटनाला गेलो म्हणजे, आम्ही त्या घोटाळ्यात आहे का? तुम्ही अनेक बँका, पतसंस्थांची उद्घाटन केली. तिथं भ्रष्टाचार झाला, मग तुम्ही दोषी आहे का? राजकीय स्वार्थासाठी कुणावर तरी आरोप करायचा, हा प्रकार सुरू आहे,' असेही नीलेश लंके यांनी म्हटले.

मंत्री विखेंनी कशी क्लीन चीट घेतली

'प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं. हे कर्ज माफ झाल्यानंतर तुम्ही ते स्वतःच्या खिशात भरलं. त्याबाबत तुमच्यावर गुन्हा दाखल झाला. तुमचं सराकर असल्यामुळे तुम्ही त्यातून क्लीन चीट घेतली. या अहिल्यानगर शहरात नंदकुमार पवार यांची पटवर्धन पतसंस्था होती, ही पतसंस्था अडचणीत आल्यानंतर प्रवरा बँकेकडे विलीन केली. अनेक ठेवीदारांवर आत्महत्येची वेळ आली. अनेकांच्या ठेवी गेल्या, पण आजही ठेवी दिलेल्या नाहीत. वेगवेगळ्या योजनेत भ्रष्टाचार झाले, सिस्पे घोटाळ्याला आठ महिने झाले, तुम्ही आता बोलत आहात. देशाच्या गृहमंत्र्यांना भेटायला पाहिजे होते,' असे नीलेश लंके यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत लंकेंच्या नावानं घोषणा

'यात माझा सहभाग असता, पण माझा कुठलाही संबंध नाही. फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी हा प्रकार सुरू आहे. प्रत्येक व्यासपीठावर गेल्यावर नीलेश लंकेंचे नाव घेतल्याशिवाय यांच्या सभेला सुरूवात होत नाही. सभेचा शेवट देखील होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या सभेत देखील 'रामकृष्ण हरी, नीलेश लंकेंना बसवा घरी', अशा घोषणा. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचारावर बोलायला पाहिजे होते. काय योजना देणार, हे सांगायला पाहिजे होते. पण नुसतं राजकीय स्वार्थासाठी नीलेश लंकेंना बदनाम करायचं, हा प्रकार सध्या सुरू आहे,' असेही नीलेश लंके यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com