Shivsena Dasara Melava: दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ भरपावसात धडाडली; 'ही' आहेत भाषणातील 10 मोठी विधानं

Shivsena Uddhav Thackeray: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले होते.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता.
Shivsena Dasara Melava 2023
Shivsena Dasara Melava 2023 Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवसेनेच्या दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले होते.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता.यावेळी पावसाचे वातावरण आणि सर्वत्र चिखल असूनही लाखो शिवसैनिकांनी या मेळाव्याला उत्साहात उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) गुरुवारी (ता.2 ऑक्टोबर) यांनी दसरा मेळाव्यात शिवसैनिकांसोबत ठाकरेंनी विचारांचं सोनं लुटलं. ठाकरेंनी यावेळी आपल्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर मोठं विधान केलं. तसेच पुन्हा एक फूल दोन हाफ म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री अजित पवार,एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील हे आहेत प्रमुख मुद्दे:

1) उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर बोलताना ५ जुलैला आम्ही काय केलं.मी त्याचवेळी सांगितलं होतं.आम्ही एकत्र आलोय, ते एकत्र राहण्यासाठीच असं बोलत मनसेसोबतची युतीवर शिक्कामोर्तब.

2) देशभक्त असणारे सोनम वांगचूक एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेले, म्हणून त्यांना देशद्रोह ठरवण्यात आले.मग गुपचूपपणे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी (Narendra Modi) कोण?

3) सध्याचे मुख्यमंत्री,जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणाले होते. आज म्हणतात की ओला दुष्काळ असा काही प्रकारच नाही.कोणतेही निकष न लावता सरकारने हेक्टरी 50 हजार रुपये जाहीर करण्याची मागणी.

Shivsena Dasara Melava 2023
Gopichand Padalkar News : ...म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बिरोबा बनातून पुन्हा एकदा झोडून काढलं; पडळकरांचा मोठा खुलासा

4) तीन वर्षे मणिपूर जळत होते,पण आता मोदी मणिपूरला गेले.त्या नावातील मणी यांना दिसला,पण त्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत.

5) बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं.गाढवावर कितीही शाली टाका.गाढव ते गाढवच असते.

6)आमचा हिंदीला विरोध नाही. पण हिंदीची सक्तीही आम्ही खपवून घेणार नाही.

7)हिंदुत्वाच्या मुद्यावर अंगावर येऊ नका,आमच्या अंगावर आलात, तर तुमचे टोप्या घातलेल्या फोटोचे प्रदर्शन लावू.

8) मुंबईतील कोस्टल रोड, वरळीतील बीडीडी चाळ, मुंबईतील नाईट लाईफ या आपल्या संकल्पना आहेत.

9)बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये मोदी सरकारनं जमा केले. पण, या सरकारकडं राज्यातील शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत.

10) देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. आई आणि पत्नीच्या नावावर डान्सबार सुरु आहेत, मुख्यमंत्री त्यावर कारवाई करत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

Shivsena Dasara Melava 2023
Sanjay Raut : ...'हे' ही अन् पलीकडचंही शिवतीर्थ आपलेच ; संजय राऊतांचे भाषण युतीच्या संकेतातच अडकले

11) आमच्याकडचं'जे पळवलं ते पितळ होतं,सोनं माझ्याकडे'आहे.

12) तीन वर्षे मणिपूर जळत होते, पण आता मोदी मणिपूरला गेले. त्या नावातील मणी यांना दिसला, पण त्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू दिसले नाहीत.

13) राज्यातील दोन फूल आणि एक हाफ म्हणत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी राज्यात महापुराचं संकट असताना दिल्लीत जाऊन बसायला हवं होतं.तसेच केंद्राकडून वीस-पंचवीस हजार कोटींचं पॅकेज आणायला हवं होतं. पण मोदींना प्रस्ताव पाहिजे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com