Sharad Pawar vs Ajit Pawar faction Parner : पारनेरमध्ये पवारविरुद्ध पवार, अजितदादांची राष्ट्रवादी साहेबांच्या शिलेदाराशी भिडणार? राणी लंके 'झेडपी'च्या रिंगणात?

Ahilyanagar ZP Election Ajit Pawar NCP vs Sharad Pawar NCP MP Nilesh Lanke in Parner : पारनेर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या आरक्षणामध्ये अनेक इच्छुकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे 'कही खुशी, कही गम', असे वातावरण तयार झाले आहे.
Ahilyanagar Nilesh Lanke ZP
Ahilyanagar Nilesh Lanke ZPSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Zilla Parishad election : पारनेर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या आरक्षणामध्ये अनेक इच्छुकांची गैरसोय झाली आहे. काहींच्या बाबतीत मात्र आरक्षण सोयीचे निघाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आजच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद गण व गटाच्या आरक्षणाच्या सोडतीमुळे इच्छुकांमध्ये 'कही खुशी, कही गम', असे वातावरण तयार झाले आहे.

पारनेर तालुक्यात पंचायत समितीसाठी खरी लढत पक्षीय न होता, महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार काशिनाथ दाते, भाजपविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके अशी होणार आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यावेळी पारनेरमध्ये लोणीतून रसद पुरवणार का? भाजपला बळ देणार की, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला, याकडे स्थानिकच्या नेत्यांचे लक्ष असणार आहे.

पारनेर (Parner) जिल्हा परिषद टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने सुजित झावरे यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता त्यांना त्यांच्या पत्नी यांना राजकारणात आणावे लागणार आहे किंवा त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे, तर सुपे गट नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाल्याने माजी जिल्हा परिषद सदस्या राणी नीलेश लंके यांच्या सोयीचे आरक्षण निघाले आहे. मात्र त्यांनी नुकतीच विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्या आता पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढविणार की नाही, हा प्रश्न आहे.

या गटात माजी सभापती गणेश शेळके हे मात्र जिल्हा परिषद (Zilla Parishad) निवडणूक लढविण्याच्या तयारीत होते. आता मात्र त्यांच्या पत्नी सुषमा शेळके यांना उमेदवारी करावी लागणार आहे. तसेच या गटात तेजश्री थोरात याही इच्छुक आहेत. सुपे गटात राहुल शिंदे यांची मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्या पत्नी प्रियांका यांनाही उमेदवारी करता येणार नसल्याने त्यांची मोठी राजकीय गैरसोय झाली आहे.

Ahilyanagar Nilesh Lanke ZP
Shankarrao Gadakh: शंकरराव गडाख नेवाशाच्या मैदानात 'मशाल' घेऊन उतरणार की, 'बॅट'!

जवळा गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने विश्वानाथ कोरडे व डॉ. श्रीकांत पठारे यांच्या पथ्यावर पडला आहे. येथे त्यांच्या सोयीचे आरक्षण निघाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ahilyanagar Nilesh Lanke ZP
Ram Shinde BJP Vs Rohit Pawar NCP : अनेकांचे मनसुबे धुळीस; तरीही राम शिंदे अन् रोहित पवार धुरळा उडवणार

पारनेर पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने आता अनेक पुरुष मंडळीचे स्वप्न भंगले आहे. आता सुपे, अळकुटी, जवळा या सर्वसाधारण गणांतून निवडून आलेल्या किंवा ढवळपुरी तसेच टाकळी ढोकेश्वर गणांतून निवडून आल्यानंतर या पाच महिलांना सभापती होण्याची संधी मिळणार आहे. सुपे गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव निघाल्याने राहुल शिंदे यांच्या पत्नी प्रियंका शिंदे तसेच मनीषा रोकडे व सुरेखा पवार इच्छुक आहेत. तसेच निघोज गणातून सचिन वराळ यांच्या पत्नी, अळकुटी गणातून डॉ. शिरोळे यांच्या पत्नी, जवळा गणातून सोनाली सालके तसेच दर्शना सरडे या इच्छुकांना सभापती होण्याची संधी मिळू शकते.

महायुती अन् मविआला इच्छुकांमुळे धोका

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी, यांच्या पक्षीय आघाड्या होणार की नाही, हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार, हे सांगणे कठीण असल्याने आगामी काळात लढत कशी आणि कोणा कोणात होणार, हे सांगणे कठीण आहे.

सत्ता कोणाकडे जाणार याची उत्सुकता

पारनेर तालुक्यात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार काशिनाथ दाते, तर खासदारही महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके आहेत. त्यामुळे आगामी पंचायत समिती निवडणूक महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी. अशीच होणार आहे. या शिवाय ही निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे. त्यामुळे पारनेर पंचायत समितीवर महायुतीची की महाआघाडीची सत्ता येणार, हे मात्र आताच सांगणे कठीण आहे.

तुल्यबल लढतीची शक्यता

सध्या तालुक्यावर दोन्ही गटांचे समान वर्चस्व असल्याचे चित्र आहे. तसेच विविध पक्षांत युती होणार की ते स्वतंत्र लढणार, यावर बरेचसे चित्र अवलंबून आहे. मतदार आता पंचायत समितीची सत्ता महाविकास आघाडी की महायुतीच्या ताब्यात देणार, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com