Monika Rajale vs Pratap Dakhane
Monika Rajale vs Pratap DakhaneSarkarnama

Monika Rajale vs Pratap Dakhane : तीन आमदार, दोन माजी आमदारांची फौज पाथर्डीत धुमाकूळ घालणार; प्रताप ढाकणेंच्या पुत्राचे लाॅचिंग?

Pathardi Monika Rajale vs Pratap Dakhane in Ahilyanagar Polls : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी पाथर्डी तालुक्यातील तीन आमदार, दोन माजी आमदारांमध्ये घमासान होण्याची चिन्हं आहेत.
Published on

Ahilyanagar Zilla Parishad election : पाथर्डीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांच्या आरक्षणात काही अपवाद वगळता जुन्या चेहऱ्यांना परत एकदा संधी मिळणार असल्याने व नव्या चेहऱ्यांना सुद्धा वाव असल्याने तालुक्याच्या राजकारणात खुशीचा माहोल दिसून येत आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप आमदार मोनिका राजळे, राष्ट्रवादीचे आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, शरद पवार यांचे शिलेदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, अ‍ॅड. प्रताप ढाकणे, यांच्यात सामना रंगण्याची चिन्हं आहेत.

अहिल्यानगर इथं जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) पाच गटांचे, तर पंचायत समितीच्या दहा गणांचे आरक्षण तहसील कार्यालयात प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, नायब तहसीलदार दिग्विजय पाटील, रवींद्र शेकटकर व दादासाहेब वावरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.

पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण हे अनुसूचित जाती महिला असून, हे आरक्षण कोणत्या गणात पडते, या विषयी मोठी उत्कंठा होती. हे आरक्षण भाजप (BJP) आमदार मोनिका राजळे यांचे होमग्राऊंड असलेल्या कासार पिंपळगाव गणात पडल्याने विद्यमान सदस्य विष्णुपंत अकोलकर यांची संधी हुकली.

Monika Rajale vs Pratap Dakhane
PM Kisan Yojana: आता 'पीएम किसान योजना' अडचणीत? 'या' खात्यांवर सरकारला संशय; होणार फेरतपासणी

या गणातून आमदार मोनिका राजळे देतील तो उमेदवार विजयी होणार असल्याने कोणाला उमेदवारी द्यायची, याची डोकेदुखी असणार आहे. या गणातून सध्या राजळे यांचे निकटवर्ती नितीन एडके यांच्या मातोश्री सुनीता राजेंद्र एडके, सुनीता चंद्रकांत पाचरणे, अनिता विलास गजभिव, कांचन सुनील परदेशी, संगीता काका शिंदेंसह अनेक जण इच्छुक आहेत. इतर नऊ गणांपैकी सात गणांतील सर्वच विद्यमान उमेदवारांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते किंवा या ठिकाणी नवीन चेहरेही उभे राहू शकतात.

Monika Rajale vs Pratap Dakhane
Sangram Jagtap Sangamner Hindu Morcha : अजितदादांच्या शिलेदाराचा 'हिंदुत्वाचा रथ' सुसाट; नोटिशीच्या सूचनेनंतरही संग्राम जगतापांची तोफ धडाडली, 'हिरव्या' सापांना ठेवण्याची भाषा

प्रताप ढाकणेंच्या पुत्राचं लाॅचिंग

जिल्हा परिषदेचे जे पाच गट आहेत, त्या गटांतून पूर्वीच्याच सर्व सदस्यांना पुन्हा एकदा उभे राहण्याची संधी मिळू शकते. अॅड. प्रताप ढाकणे यावेळी आपले पुत्र ऋषिकेश ढाकणे यांना उभे करू शकतात, तर अर्जुनराव शिरसाट यांना यावेळी आपल्या पत्नीलाच उभे करावे लागणार आहे.

राजळे अन् ढाकणेंची पत्ते क्लोज

पाथर्डी तालुक्यात राजळे यांचा मोठा प्रभाव असला, तरीही भालगाव व टाकळी मानूर गटात व गणात त्यांना कसरत करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रताप ढाकणे सध्या सक्रिय नसले, तरीही निवडणूक काळात ते काय करतात, यावर बरचं काही अवलंबून आहे. या निवडणुका लांबल्याने अनेक नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यास इच्छुक असल्याने सर्वच पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

बालेकिल्ले शाबूत ठेवण्याची कसरत

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद सदस्य आमदार शिवाजीराव गर्जे यांनी सुद्धा निवडणुकीची तयारी चालवली असून, काही गणांत व गटांत ते आव्हान उभे करू शकतात. तिसगाव व करंजी गटांत आमदार शिवाजीराव कर्डिले विरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे असा सामना रंगेल, तर उर्वरित तीन गटांत राजळे विरोधात गर्जे व माजी आमदार चंद्रशेखर घुले, असा सामना रंगेल.

पाथर्डी पंचायत समिती आरक्षण पुढीलप्रमाणे

कासार पिंपळगाव - अनुसूचित जाती (महिला), कोरडगाव - सर्वसाधारण, भालगाव - सर्वसाधारण, अकोला - सर्वसाधारण, माळी बाभूळगाव - नागरिकांच्या मागास प्रवर्ग, तिसगाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), मिरी - सर्वसाधारण खुला, करंजी - सर्वसाधारण (महिला), माणिकदौंडी - सर्वसाधारण (महिला), टाकळीमानूर - सर्वसाधारण (महिला)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com