महेश माळवे :
Ahmednagar News: काँग्रेसने नगर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरातांची पकड पाहायला मिळाली. यानंतर आता तालुकानिहाय काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर होत आहे.
श्रीरामपूर काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यातही थोरातांची छाप दिसते आहे. शहर आणि ग्रामीण असा समतोल साधला गेला आहे. श्रीरामपूर शहराध्यक्षपदाचा अनेक वर्षांपासून वादाचा मुद्दा होता, तो या कार्यकारिणीतून निकाली लागला आहे.
माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि आमदार लहू कानडे समर्थकांची निवड करत समतोल साधला गेला आहे. विधानसभा निवडणुकीत निर्णय घेण्यापासून सुरू झालेला प्रवास आमदार लहू कानडे यांच्या उमेदवारीपर्यंत येऊन ठेपला. यानंतर काँग्रेसमधील ससाणे गटाने थोरात यांच्या सूचनेनंतर कानडे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केला.
निवडणुकीनंतर दोघेही एकदिलाने राहत होते. ससाणे यांच्या कार्यालयातच सर्व बैठका होत. नंतर कानडे यांनी खरेदी-विक्री संघाच्या इमारतीत कार्यालय सुरू केले. त्यानंतर तालुक्यातील विकासकामांचे दौरे सुरू झाले. उक्कलगाव येथील एका सभेत वादाची ठिणगी पडली आणि दोघांत वितुष्ट आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यानच्या काळात काँग्रेस शहराध्यक्ष निवडीवरून पुन्हा वादविवाद सुरू झाले. तत्कालीन शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी पुन्हा वर्णी लावण्यासाठी आग्रह धरला. त्याला कानडेंकडून विरोध झाला. हा वाद थेट थोरात यांच्या दालनात पोहोचला.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी समेट घडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही. तालुक्यात कार्य़क्रमासाठी थोरात आल्यानंतरही दोन्ही गट उपस्थिती लावत. त्यातही शहराध्यक्ष व कार्य़कारिणीच्या निवडीचा विषय निघत. मात्र, थोरात बगल देऊन वादावर बोलण्याचे टाळत.
नंतरच्या काळात छल्लारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधले. अशोक कारखाना निवडणुकीत ससाणे यांनी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याशी युती केली. बाजार समिती निवडणुकीतही ससाणे, मुरकुटेंच्या सोबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे विरोधात शेतकरी संघटना, आदिक व कानडे अशी लढत पाहायला मिळाली.
निवडणुकीनंतर विखेंशी फारकत घेत ससाणे-मुरकुटे एकत्रित सत्तेवर आले. सध्या पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही सर्वच गटाने आपले नशिब आजमावले. त्यात सर्वांनाच कमी अधिक यश मिळाले. दरम्यानच्या काळात काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली. यात सचिन गुजर यांना बढती मिळून ते वरिष्ठ उपाध्यक्ष झाले.
आमदार कानडे यांच्याकडून त्यांचे दोन्ही बंधू अंकुशराव व अशोक कानडे यांच्यासह नऊ जणांची वर्णी लावण्यात आली. ससाणे गटातील आठ जणांना संधी मिळाली. तालुकाध्यक्षपदी अरुण नाईक यांची फेरनिवड झाली, तर शहराध्यक्षपदी माजी आमदार (कै.) जयंत ससाणे यांचे मित्र अण्णासाहेब डावखर यांची निवड करून थोरातांनी समतोल साधला.
Edited by : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.