Heramb Kulkarni Attack : काँग्रेसच्या नगर अध्यक्षांचे धाडसच वेगळे; कुलकर्णींवरच्या हल्ल्यानंतर थेट स्टिंग ऑपरेशनच केले

Kiran Kale News : हेरंब कुलकर्णी यांच्यावर शाळा परिसरात सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या टपरी चालकाने मित्रांकरवी प्राणघातक हल्ला केला होता.
Kiran Kale, Heramb Kulkarni News
Kiran Kale, Heramb Kulkarni NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी नगर शहरातील टपरी मटका जुगार खेळत मोठे स्टिंग ऑपरेशन केले. ही मटका जुगार चालवणारी टपरी शाळा परिसरात आहे. यासाठी काळे यांनी वेशांतर केले होते. हा सर्व प्रकार त्यांनी समाजमाध्यमांवर लाइव्ह केला आहे. सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शाळा परिसरात सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या टपरी चालकाने मित्रांकरवी प्राणघातक हल्ला केला होता.

या प्रकरणानंतर नगर शहरातील टपऱ्यांच्या माध्यमातून सुरू असलेले अवैध धंदे चर्चेत आले होते. या धंद्यांची पोलखोल करण्यासाठी काळे यांनी स्टिंग ऑपरेशन केले. काळे यांच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे नगर शहर पोलिसांची अवैध धंद्यांवरील कारवाईची भूमिका चर्चेत आली आहे. काळे यांनी काँग्रेसच्या (Congress) कार्यकर्त्यांसह नगर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मार्कंडेय विद्यालय आणि प्रगत विद्यालयाजवळ गांधी मैदानातील एका टपरीवर मटका जुगार खेळला. यासाठी काळे यांनी वेशांतर केले होते. पायजमा, शर्ट, टोपी, गळ्यात पांढरा पंचा, असा ग्रामीण पेहराव केला होता. मटका जुगाराची चिठ्ठी घेताना त्यांनी तोंडाला पंचा गुंडळला होता. हा मटका जुगार टपरीवर कसा चालवला जातो, याचे त्यांनी समाजमाध्यमावर लाइव्ह केले.

Kiran Kale, Heramb Kulkarni News
Rajasthan Assembly Election : सत्ता कुणाचीही असो राजस्थानमध्ये 20 वर्षांपासून गेहलोत अन् वसुंधरा राजेंचाच जलवा

काळे यांनी या स्टिंग ऑपरेशननंतर पत्रकार परिषद घेतली. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) होण्याची सर्वांनाच गरज आहे, असे सांगून काळे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना मी कुलकर्णी असे लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. मुलांचे भवितव्य खराब करणाऱ्या या अवैध धंदे चालवणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई होत नसल्याचा निषेध या वेळी काळे यांनी केला.

कुलकर्णी यांच्यावर शाळेच्या परिसरात असलेल्या अवैध धंदा चालवणाऱ्या टपरी चालकाने भ्याड हल्ला केला होता. काळे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. यानंतर काळे यांनी गुरुवारी हे नगर शहरात स्टिंग ऑपरेशन केले. मार्कंडेय शाळेच्या प्रवेशद्वारापासून मटक्याच्या टपरीपर्यंतचे अंतर मोजले असता ते 30 मीटर भरते. केंद्र सरकारच्या 2003 च्या कायद्यानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या 2011 च्या अध्यादेशानुसार कोणत्याही शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारापासून 100 मीटरच्या आतमध्ये अवैध धंद्यांना अटकाव आहे. नगरमध्ये या नियमाची अंमलबजावणी होत नाही. विशेष म्हणजे अवैध धंद्यांवरील कारवाईत पोलिस प्रशासन दुर्लक्ष करते, असा आरोप किरण काळे यांनी केला.

काळे यांनी स्टिंग ऑपरेशननंतर पोलिस (Police) अधीक्षक राकेश ओला, कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून कारवाईची मागणी केली. यानंतर पोलिसांनी टपरीवर कारवाई केली. महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनादेखील मटका जुगार चालवणाऱ्या टपरीवर तातडीने कारवाईची मागणी काळे यांनी केली आहे.

काळे यांनी मटका जुगारासाठी क्रमांक सांगितला. त्यावर त्यांनी 225 रुपये लावले. त्यासाठी जुगार चालवणाऱ्याने 500 रुपये घेऊन 225 रुपये परत दिले. येथे मटका जुगार चालकाने 50 रुपयांना गंडवल्याची माहिती काळे यांनी दिली. पत्रकार परिषदेला संजय झिंजे, अनिस चुडीवाला, दशरथ शिंदे, उषाताई भगत, सुनीताताई भाकरे, आकाश आल्हाट, विलास उबाळे, सोफियान रंगरेज, विकास भिंगारदिवे, किशोर कोतकर, अभिनय गायकवाड, सुजित क्षेत्रे उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

Kiran Kale, Heramb Kulkarni News
Ashish Deshmukh News : नेते, हायकमांड पटोलेंना गांभीर्याने घेत नव्हते, आता कार्यकर्तेही ऐकत नाहीत; देशमुखांचा टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com