Ahmednagar Politics : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा पेटला; अहिल्यादेवीनगर नावावर पोपटराव पवार यांचं भाष्य

Popatrao Pawar on Ahmednagar Renamed Issue : अहमदनगर जिल्हा नामांतराच्या मुद्द्यावर आता सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी भाष्य केले आहे...
Popatrao Pawar
Popatrao PawarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Renamed Issue News :

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा ठराव महापालिका प्रशासकाने मंजूर करून विभागीय आयुक्तांमार्फत राज्य सरकारला पाठवला आहे. यानंतर पुन्हा एकदा नगर जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा पेटू लागला आहे. यातच पद्मश्री पोपटराव पवार यांनी नामांतराच्या आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नावावर भाष्य केले आहे.

Ahmednagar चे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करण्याचा ठराव नुकताच महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी केला. याबद्दल नगरच्या पंडित दीनदयाळ सहकारी पतसंस्थेच्या वतीने पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा सत्कार करण्यात आला. पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, मानद सचिव विकास पाथरकर, उपाध्यक्ष सुधीर पगारिया, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, अस्थापना प्रमुख मेहेर लहारे आदी उपस्थित होते.

Popatrao Pawar
Nagar Politics News : रस्ते निधीतून आमदार जगतापांचा विरोधकांना 'राजकीय पंच'

पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, "अहिल्यादेवी होळकर या मातेने राष्ट्राला उभे करत संपूर्ण देशात पाणवठे निर्माण करून दुष्काळ निवारण्याचे मोठे पुण्याचे काम केले आहे. अशा अहिल्यादेवींच्या नावाने आता अहमदनगरचे ( Ahmednagar Politics ) नामांतर होत आहे. अहिल्यादेवींनी केलेले दुष्काळ निवारण्याचे काम व नगरमध्ये असलेली पाण्याची परिस्थिती याचा मेळ घालण्याची नैतिक जबाबदारी सर्वांवर आहे. हा मेळ जर घातला गेला तरच पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर या नामांतराला अर्थ आहे. नगर शहरातील सीना नाला व भिंगार नाल्याला स्वच्छ करून प्रवाहित करू. त्याचवेळी हे नामकरण योग्यप्रकारे झाले असे म्हणता येईल".

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर शहरात बऱ्याच समस्या अद्याप प्रलंबित असून, त्या कमी करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून ठोस पावले उचलत आहोत. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहभागातून शहरास सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अहिल्यादेवीनगर नामांतरासाठी मी केवळ प्रशासकीय काम करून कर्तव्य बजावले आहे, असे आयुक्त पंकज जावळे यांनी सांगितले. वसंत लोढा यांनी प्रास्ताविकात नगरच्या नामांतराचा विषय मागील एक वर्षापासून प्रलंबित होता. प्रशासनाने त्याचा ठराव केल्याने तो आता मार्गी लागत आहे. नगरची झालेल्या दुरवस्था दूर करण्यासाठीदेखील प्रशासनाने असाच पुढाकार घ्यावा, असे म्हटले आहे.

R

Popatrao Pawar
Sujay Vikhe Vs Ram Shinde : खासदार विखेंच्या कार्यक्रमात आमदार शिंदेंचाच 'कार्यक्रम'?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com