Sujay Vikhe Vs Ram Shinde : खासदार विखेंच्या कार्यक्रमात आमदार शिंदेंचाच 'कार्यक्रम'?

Lok Sabha Election 2024 : आमदार शिंदे यांनी नगर दक्षिण लोकसभेसाठी दावा केला आहे. खासदार विखे यांनीदेखील उमेदवारीसाठी तयारी केली आहे.
ram shinde sujay vikhe
ram shinde sujay vikhesakarnama

अहमदनगर : 5 मार्च | गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) महिला वर्गासाठी सातत्याने विविध कार्यक्रम घेणारे खासदार डॉ. सुजय विखे ( Sujay Vikhe Patil ) यांनी चार वर्षांनंतर आगामी लोकसभा 2024 ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून जामखेडमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाच्या मुख्य मंचावर भाजपचे नेते आमदार राम शिंदे ( Ram Shinde ) यांचा फोटो टाळण्यात आला असून, खासदार विखे यांचाच एक फोटो लावण्यात आला होता. यावरून खासदार विखे आणि आमदार शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष तीव्र झाल्याची चर्चा होती. पण, खासदार विखे आणि आमदार शिंदे यांच्यातील संघर्षात कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सध्या तरी या दोन्ही नेत्यांची मर्जी संभाळताना दिसत आहेत.

ram shinde sujay vikhe
Yashwant Sakhar Karkhana Election : शेतकरी विकास आघाडीनं मात्तबरांना घेरलं, प्रशांत काळभोरांनी विरोधकांना केला 'हा' सवाल

जामखेड महाविद्यालयामध्ये जनसेवा फाउंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe Patil ) यांच्यासह त्यांची पत्नी धनश्री विखे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक भाजप कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. खासदार विखे यांच्या यंत्रणेनं कार्यक्रमाची मोठी जाहिरातबाजी केली होती. कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला खासदार विखे, तर दुसऱ्या बाजूला आमदार शिंदे यांचा फोटो लावला होता. मात्र, कार्यक्रमाच्या मुख्य मंचावर आमदार शिंदे यांचा फोटो टाळला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार शिंदे ( Ram Shinde ) यांनी नगर दक्षिण लोकसभेसाठी दावा केला आहे. खासदार विखे यांनीदेखील उमेदवारीसाठी तयारी केली आहे. यातून ते नगर दक्षिण मतदारसंघातील तालुक्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देत आहेत. जामखेडमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. पण, आमदार शिंदे यांनी विखेंचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. जामखेड येथे खासदार विखे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना काही दिवसांपासून आमदार शिंदे हजर राहत नाहीत.

ram shinde sujay vikhe
Lok Sabha Election 2024 : ...तर शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये सुटेल जागावाटपाचा तिढा!

जामखेडमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता आहे. खासदार विखेंबरोबर जायचे की, आमदार शिंदेंबरोबर राहायचे. यातून त्यांचा संभ्रम उडाला आहे. खासदार विखेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलं जातं. आग्रह धरला जातो. त्यामुळे जामखेड-कर्जतमध्ये विखेंविरोधात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी जरी असली, आग्रहामुळे कार्यक्रम टाळत नाहीत. जामखेड-कर्जत तालुक्यातील भाजप कार्यकारिणीतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आमदार शिंदे यांचा वरचष्मा आहे. खासदार विखे आणि आमदार शिंदे यांच्यात संघर्ष असला, तरी कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे सध्या तरी या दोन्ही नेत्यांची मर्जी सांभाळताना दिसत आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

ram shinde sujay vikhe
Konkan Politics: कोकणातील राजकारण तापलं; भाजप- राष्ट्रवादी वादात आता शिंदेंच्या शिवसेनेची उडी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com