Nagar Political News : नगर शहरातील रस्त्यांबाबत नेहमीच बोंब होत असते. खड्ड्यात रस्ते आहेत की, रस्त्यावर खड्डा, असेच काहीशी टीका होते. सर्वसामान्य नगर शहरातील रस्त्यांबाबत नेहमीच नाक मुरडतो.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी नगरच्या रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा निधी मंजूर करून आणला आहे. यातून नगर शहराचा मध्यवर्ती भाग आणि उपनगरातील प्रमुख रस्त्यांची कामे होणार आहेत.
रस्त्यांची ही कामे महायुतीच्या उमेदवाराची लोकसभेची, तर आमदार जगतापांची विधानसभेची वाट सुखकर करतील, असेच काहीसे राजकीय गणित आहे. यातून नगर (Ahmednagar) शहरातील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार असला, तरी विरोधकांसाठी आमदार जगताप यांनी मंजूर करून आणलेला निधी हा 'राजकीय पंच' ठरला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार जगताप यांनी नगर शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती देण्यासाठी काल सायंकाळी तातडीने पत्रकार परिषद घेतली. यात मंजूर रस्त्यांची आणि काम सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची माहिती दिली.
ते म्हणाले, "महापालिकेमार्फत डीपी रस्त्यांसाठी एकूण 313 कोटींचा आराखडा पाठवला गेला होता. पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपये मंजूर झाले. यात नगर शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते, उपनगरातील प्रमुख रस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे".
या निधीच्या कामातून होत असलेल्या रस्त्यांनी नगर शहराचा चेहरामोहरा बदलेल. रस्ते विकासासाठी महायुती (Mahayuti) सरकारने हा निधी उपलब्ध करून दिला आहे. आजवर इतका निधी मंजूर झाला नव्हता, असेही आमदार जगताप Sangram Jagtap यांनी म्हटले.
माऊली संकुल, गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 15 कोटी, सर्व मंगल कार्यालय ते भिंगारवाला चौक तीन कोटी 66 लाख, ज्येष्ठ नागरिक भवन ते सीना नदी रस्ता 12 कोटी 34 लाख, केडगावमधील जेएलपी रेसिडेन्सी ते पुणे रस्ता सहा कोटी, सावेडीतील अष्टविनायक अपार्टमेंट ते टेलिफोन कार्यालय, एकवीरा चौक ते तपोवन रस्ता सात कोटी 68 लाख, मुकुंदनगरमधील सीआयव्ही कॉलनी रस्ता पाच कोटी 16, भवानीनगरमधील इंद्रप्रस्थ कार्यालय ते बुरुडगाव रस्ता 13 कोटी 50 लाख, बुरुडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन ते वाकडी रस्ता दोन कोटी 40 लाख, माळीवाडा वेश ते पंचपीर चावडी ते भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक 10 कोटी 67 लाख.
पत्रकार चौक-अप्पू हत्ता चौक-न्यू आर्ट्स कॉलेज रस्ता 15 कोटी 74 लाख, नगर वाचनालय-गांधी मैदान-गाडगीळ पटांगण-अमरधाम पाच कोटी 40 लाख, बोल्हेगावमधील रस्त्यासाठी चार कोटी 91 लाख, दिल्ली दरवाजा-बागरोजा हडको-नेप्ती नाका चौक रस्ता चार कोटी 5 लाख, जीपीए चौक-धरती चौक-बाजार समिती चौक सहा कोटी 39 लाख, गोविंदपुरा नाका-पोलिस चौकीपर्यंत रस्ता दोन कोटी 58 लाख, तपोवन रस्त्यावरील राजामाता जिजाऊ सांस्कृतिक भवनापर्यंतचा रस्ता तीन कोटी 23 लाख, प्रभाग दोनमधील शामसुंदर पॅलेस-हिमंतनगर रस्ता तीन कोटी 11 लाख, सारसनगरमील छत्रपतीनगरपर्यंतचा रस्ता दोन कोटी 38 लाख, यशोदानगर-सपकाळ रुग्णालय-किंग कॉर्नर रस्ता तीन कोटी 43 लाख प्रोफेसर कॉलनी-गंगा उद्या रस्ता पाच कोटी 99 लाख, अशी कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.
तसेच या कामाव्यतिरिक्त सीना नदी सुशोभीकरणासाठी 15 कोटी, तर पोलिस अधीक्षक चौक-पत्रकार वसाहत चौकापर्यंत 17 कोटी रुपयांचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. माळीवाडा बस स्थानकाच्या पुनर्जीवनासाठी 16 कोटी 50 लाख, सावेडी बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटी, अहमदनगर महाविद्यालय ते सोलापूर Solapur Mahamarga महामार्ग आणि त्यावरील पुलासाठी आठ कोटी 50 लाख, पुणे महामार्ग-कल्याण महामार्ग लिंक रस्त्यासाठी विविध टप्प्यात एकूण 47 कोटी, केडगाव-नेप्ती उपबाजार समिती रस्त्यासाठी 21 कोटी, सावेडी गावठाण-निंबळक बाह्यवळण रस्त्यासाठी पुलासह 13 कोटी, उड्डाणपुलाखालील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी स्ट्रॉग ड्रेनेजसाठी पाच कोटी, छत्रपती अश्वारूढ पुतळा-माळीवाडा वेस रस्त्यासाठी चार कोटी 75 लाख मंजूर झाले आहेत, अशी माहिती आमदार जगताप यांनी दिली.
Edited By : Rashmi mane
R