Diwali Special Program : 'दीपावली फराळ' कार्यक्रमातून नेते आजमावताय मतदारसंघातील ताकद!

Diwali Program and local politics : नेते मंडळींकडून आग्रहाचे बोलावणे, तर नागरिकांना मिळतेय गोडधोड मेजवानी
Diwali Special Program : 'दीपावली फराळ' कार्यक्रमातून नेते आजमावताय मतदारसंघातील ताकद!
Sarkarnama
Published on
Updated on

Ahmadnagar Politics : दिवाळी निमित्त गाव कारभाऱ्यापासून ते तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नेतृत्व करणारे आमदार-खासदार यांच्या वतीने आपल्या कार्यकर्त्यांसह समर्थकांसाठी आणि नागरिकांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

यंदाही नगर जिल्ह्यात विविध नेत्यांनी आपल्या मतदारसंघात तालुक्याच्या ठिकाणी किंवा आपल्या मूळ गावी दिवाळी फराळाचे आयोजन केले आहे. मात्र यंदाच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाला पुढील वर्षी असणाऱ्या निवडणुकांची जोड असल्याने दिवाळी फराळाचे कार्यक्रम यंदा जोरदार असल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Diwali Special Program : 'दीपावली फराळ' कार्यक्रमातून नेते आजमावताय मतदारसंघातील ताकद!
Raju Shetti on Sugarcane FRP : ''शेतकऱ्यांनी संयम सोडला तर... '', राजू शेट्टींचा राज्य सरकारला थेट इशारा!

पुढील वर्ष निवडणुकीचे असल्याने यंदाची दिवाळी ही नेत्यांसाठी अधिकच महत्त्वाची आणि जिव्हाळ्याची दिसत आहे. दिवाळी फराळाचा निरोप जास्तीतजास्त लोकांना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावोगावी जाऊन दिला जात आहे. तसेच काही लोकप्रतिनिधींचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, दिवाळी फराळाला आपला नेता वाट पहात असल्याचे आर्जव केले जात आहे. साधारण पाडव्याच्या दिवशी आणि त्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी या दोन दिवशी यंदा नगर जिल्ह्यातील नेत्यांनी दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

कर्जत-जामखेडचे असलेले विधानपरिषद आमदार राम शिंदे यांनी आपल्या चौंडी गावी, पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या हंगा गावी, माजीमंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले यांनी आपल्या बुऱ्हाणनगरच्या घरी 16 नोव्हेंबर रोजी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याशिवाय, नगर जिल्ह्यातील दिग्गज नेते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात यांनीही दीपावली निमित्त कार्यकर्ते-नागरिकांच्या गाठीभेटी घेत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Diwali Special Program : 'दीपावली फराळ' कार्यक्रमातून नेते आजमावताय मतदारसंघातील ताकद!
Prashant Paricharak : प्रशांत परिचारकांची यंदाची दिवाळी पालावर साजरी; 'एसी'तील नेता 'वेशी'त आल्याची चर्चा!

आमदार रोहित पवार यांनी कर्जत मध्ये मतदारसंघातील नागरिकांना दोन दिवसांपूर्वीच आपल्या 'दिनकर' या निवासस्थानी फराळ भेटीचा कार्यक्रम आयोजित करत संवाद साधला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हेच चित्र असून दिवाळी फराळ कार्यक्रमाला यंदा प्रेम-स्नेह संबंधाबरोबरच पुढील वर्षी येणाऱ्या निवडणुकांचा संदर्भ असल्याने यंदाचा दिवाळी फराळ नागरिकांना चांगलाच सुखावणारा दिसून येत आहे.

पुढील वर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही न्यायालयीन पेच सुटल्यास लागू शकतात. अशात आपल्या मतदातसंघातील नागरिकांशी अधिकाधिक सुसंवाद साधत जवळीक साधता येणार आहे. तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींना केलेल्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडता येणार आहे. त्यामुळे ही दिवाळी नागरिकांसाठी फराळाची चंगळ असणारी तर नेत्यांसाठी आपली मतदातसंघातील ताकत अजमावण्याची संधी असणारी दिसून येत आहे. त्यामुळे नेते मंडळींच्या फराळाला आलेल्या नागरिकांची चांगलीच सरबराई यंदा होताना दिसत आहे.

(Edited by- Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com