Prashant Paricharak : प्रशांत परिचारकांची यंदाची दिवाळी पालावर साजरी; 'एसी'तील नेता 'वेशी'त आल्याची चर्चा!

Prashant Paricharak's Diwali : ...त्यामुळे पहिल्यांदाच प्रशांत परिचारक हे पालावर बसल्याचे दिसून आले.
Prashant Paricharak's Diwali
Prashant Paricharak's DiwaliSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur News : भारतीय जनता पार्टीचे नेते व माजी विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी पक्षाच्या कार्यक्रमानुसार रविवारी वंचित व उपेक्षितांच्या झोपडीसमोर जाऊन त्यांना फराळ वाटून दिवाळी साजरी केली. त्यामुळे पहिल्यांदाच प्रशांत परिचारक हे पालावर बसल्याचे दिसून आले. या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हे वेगळे दृश्य पाहण्यासाठी गर्दी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prashant Paricharak's Diwali
Tanaji Sawant : फडणवीसांनी निलंबित केलेल्या 'पीआय'च्या नियुक्तीसाठी मंत्री सावंतांचा तो आटापिटा...

माजी आमदार प्रशांत परिचारक हे नेहमीच 'एसी ' तील नेते म्हणून ओळखले जातात. प्रशांत परिचारक यांचा एकूणच सार्वजनिक वावर वेगळ्या धाटणीचा असतो. त्यांचे राजकीय विरोधक दिवंगत भारत भालके हे प्रशांत परिचारकांचा उल्लेख नेहमी 'प्रिन्स चार्ल्स' अशा शब्दांत करायचे. वातानुकूलित गाडीच्या काच बंद करून फिरणारे नेते, अशी टीका त्यांच्यावर होते.

या पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारकांनी सामान्य लोकांशी संपर्क आणि संवाद ठेवावा, अशी अपेक्षा त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी नेहमी व्यक्त करीत असतात. सध्या आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन हे पद आहे, तर याशिवाय त्यांच्याकडे दुसरी कुठलेही वैधानिक पद नाही, त्यामुळे परिचारक यांच्याकडे नागरिकांशी संवाद साधण्यास बराच वेळ असतो आणि या वेळात परिचारक कार्यकर्त्यांच्या, ग्रामीण भागातील लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी प्रयत्नशील असतात. भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमातही त्यांचा वावर नेहमी दिसून येतो.

Prashant Paricharak's Diwali
Pathardi-Shevgaon BJP : ... म्हणून पाथर्डी-शेवगावात दिवाळीनंतर भाजपमध्ये धमाका होणार!

यावर्षीची दिवाळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या दारात जाऊन साजरी करावी, उपेक्षित घटकांना या निमित्ताने विविध स्वरूपात मदत करावी, असा कार्यक्रम दिला आहे.

त्यानुसार रविवारी प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर येथील इसबावी येथे जाऊन भटक्या - विमुक्त जाती वर्गातील कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. या वेळी पालावर बसून भटक्यांच्या लहान मुलांसोबत प्रशांत परिचारिकांनी लहान मुलांनाही फराळ भरवला. यानिमित्ताने एसीतील नेता वेशीत आला, अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com